मंदिरातील पुजारी मुलावर करत होता अत्याचार; पत्रकाराने बघितले आणि नंतर...; वाचा Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:40 IST2025-04-11T15:35:43+5:302025-04-11T15:40:58+5:30
Journalist Murder Case: उत्तर प्रदेशातील पत्रकाराच्या हत्येमागे मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकारही समोर आला आहे. मंदिरातील पुजाऱ्याला एका मुलावर अत्याचार करताना मयत पत्रकाराने बघितले होते.

मंदिरातील पुजारी मुलावर करत होता अत्याचार; पत्रकाराने बघितले आणि नंतर...; वाचा Inside Story
Journalist Murder News: ८ मार्च रोजी लखनौ-दिल्ली महामार्गावरील हेमपूर रेल्वे पुलावर पत्रकार राघवेंद्र वाजपेयी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या कुणी आणि का केली? याचा तपास पोलिसांनी सुरू केला. पण, महिना उलटून गेला तरी पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. शेकडो मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज खंगाळून काढल्यानंतर हत्येचं गूढ उकललं. तपासातून हत्येचं जे कारण समोर आलं, ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले. कारण मंदिरातील पुजाऱ्यानेच ही हत्या केली होती. पत्रकाराने पुजाऱ्याला मंदिरातील मुलावर अत्याचार करताना बघितले होते आणि त्यातूनच ही हत्या करण्यात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्र यांनी दिलेल्या आदेशावरून या हत्येच्या तपासासाठी १२ पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती. ८ मार्च रोजी हत्या झाल्यानंतर पुढील ३४ दिवस पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रेस झालेले हजारो मोबाईलचा तपास केला. संशयितांची चौकशी केली. २५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांना या हत्येचा धागा सापडला.
सगळीकडून घेरले आणि घातल्या गोळ्या
हेमपूर रेल्वे पुलावर आरोपींनी पत्रकार राघवेंद्र वाजपेयी यांना चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांचा रुग्णालयात आणण्याआधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
पुजाऱ्याने पत्रकाराची हत्या का केली?
पोलिसांनी या हत्या प्रकरणामध्ये कारेदेव बाबा मंदिरातील पुजाऱ्याला अटक केली आहे. त्यानेच पत्रकार वाजपेयी यांच्या हत्येची सुपारी दिली होती. शिवानंद उर्फ विकास राठोड उर्फ विकास मिश्रा असे या पुजाऱ्याचे नाव आहे.
वाचा >३ मुलांची आई शबनम पडली १२ वीचा विद्यार्थी असलेल्या शिवाच्या प्रेमात; पतीला सोडून केलं लग्न
पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, 'राघवेंद्र यांना शिवानंद बाबाबद्दल अशी माहिती कळली होती की, ज्यामुळे त्याची बदनामी झाली असती. पत्रकार वाजपेयी यांनी आरोपी शिवानंद बाबाला एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करताना बघितले होते. याबद्दल शिवानंदने त्याच्या जवळचा व्यक्ती निर्मल सिंह याला सांगितले. निर्मल सिंहने असलम गाजी याच्या मदतीने शार्प शुटर्संना पत्रकार वाजपेयीच्या हत्येची सुपारी दिली. रेकी करून त्यांनी वाजपेयींची हत्या केली.
यूपी : सीतापुर में दैनिक जागरण के पत्रकार राघवेंद्र वाजपेई की हत्या कराने वाले पुजारी शिवानंद बाबा उर्फ विकास राठौर का कुबूलनामा सुनिए -
'पत्रकार ने मुझे आपत्तिजनक अवस्था में देख लिया। वो मुझे ब्लैकमेल करके 20 लाख रुपए मांग रहा था। इसलिए 4 लाख रुपए सुपारी देकर उसको मरवा दिया' https://t.co/fyt3aaMw5Rpic.twitter.com/FNQ8kt6JJL— Sachin Gupta (@SachinGuptaUP) April 11, 2025
२० लाख मागितल्याचा शिवानंद बाबाचा आरोप
शिवानंद बाबाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्याने पत्रकार वाजपेयी यांनी २० लाख रुपये मागितले होते, असा आरोप केला आहे. पत्रकाराने याबद्दल वाच्यता न करण्याबद्दल २० लाख रुपये मागितले होते. मला ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे ४ लाख रुपयात सुपारी देऊन त्याची हत्या केली असे आरोपी शिवानंद बाबाने म्हटले आहे.