भातसा नदीपात्रालगत दहा हातभट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 12:37 PM2020-11-08T12:37:23+5:302020-11-08T12:37:56+5:30

Kasara News : शहापूर तालुक्यातील भातसा नदी पात्रा लगत दाट झुडपातील बेकायदा गावठी दारूच्या 10 हातभट्या शहापूर पोलिसांच्या 3 पथकाने धाड टाकून उध्वस्त केल्या.

Ten kilns near Bhatsa river basin destroyed by police | भातसा नदीपात्रालगत दहा हातभट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त

भातसा नदीपात्रालगत दहा हातभट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त

Next

कसारा - शहापूर तालुक्यातील भातसा नदी पात्रा लगत दाट झुडपातील बेकायदा गावठी दारूच्या 10 हातभट्या शहापूर पोलिसांच्या 3 पथकाने धाड टाकून उध्वस्त केल्या. शहापूर तालुक्यातील भातसा नदीच्या लगत झाडी झुडपातील बेकायदा गावठी दारूच्या 10 हातभट्या उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पडघा व शहापूरच्या 3 पोलीस पथकाने धाड टाकून उध्वस्त केल्या शहापूर तालुक्यातील सरलांबा गावाच्या हद्दीतील भातसा नदी व कॅनल लगतच्या झाडी झुडपात असलेल्या दारू भट्या वर हि कारवाई करण्यात आल्याने दारू धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

लॉक डाऊन काळात सुरू होत्या गावठी दारूच्या हातभट्या
ठाणे जिल्ह्यातील विशेषतः शहापूर तालुक्यात दारू माफियांनी टाळेबंदीच्या काळात दारू विक्रीला बंदी असल्याने मोठ्या प्रमाणात नदी व कॅनल लगत गावठी दारूच्या हातभट्ट्या यापूर्वी पोलिसांनी उध्वस्त केल्या होत्या. मात्र, आता अनलॉक काळात पुन्हा झपटपट पैसे कमविण्यासाठी दारू माफियांनी तालुक्यातील सरलांबा गावाच्या हद्दीत नदी व कॅनल लगतच्या झाडी झुडपातील बेकायदा हातभट्या टाकून येथे शेकडो लिटर गावठी दारू तयार केली जात होती. याची खबर स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी शहापूर उपविभागीय पथकातील 20 कर्मचारी आणि 5 महिला कर्मचारी तसेच आसीपी पडघा विभागातील 30 असे 50 ते 55 कर्मचाऱ्याचे 3 पथके गठीत करून या 10 गावठी दारूच्या हातभट्या उध्वस्त केल्या.3 हजार 830 लिटर वाँश आणि दारू बनविण्याचे साहित्य नष्ट केले धाडी दरम्यान घटनास्थळी असलेल्या 10 हातभट्टीवर दारू तयार करण्यासाठी लागणारे 3 हजार 830 लिटर कच्चामाल (वाँश) व दारू तयार करताना लागणारे साहित्य, असे एकूण 1 लाख 16 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी दिली. तर फरार झालेल्या दारू माफियांवर शहापूर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

1) शहापूर तालुक्यात अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही 
शहापूर तालुक्यात व उपविभागीय क्षेत्रात अवैध धंदे करणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल अवैध धंदे करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसून शहापूर कार्यक्षेत्रात गुन्हे गारीला आळा बसवण्यासाठी सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हेल्प लाईन नंबर सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती नव्याने पदभार घेतलेल्या शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिली.

Web Title: Ten kilns near Bhatsa river basin destroyed by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.