रत्नागिरी : दुचाकी आपघातात दहावर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 05:15 AM2021-12-16T05:15:00+5:302021-12-16T05:15:21+5:30
तालुक्यातील खंडाळा येथे भरधाव वेगाने येणार्या बल्गरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा येथे भरधाव वेगाने येणार्या बल्गरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मुलाच्या मृत्यूनंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते व त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची जादा कुमक खंडाळा परिसरात तैनात करण्यात आली होती. सायंकाळी उशिरा हा अपघात झाला.
जिंदल कंपनीच्या जेटीवरुन होणार्या अवजड वाहतुकीतील बल्गर भरधाव वेगाने घेवून जात असताना सायंकाळच्या सुमारास खंडाळा महावितरण कार्यालया जवळ दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. बल्गरची धडक जोरात बसल्याने दुचाकीवर मागे बसलेला दर्शिल प्रमोद सावंत या शाळकरी चिमुरड्याचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला तर आजोबा रामचंद्र सावंत हे जखमी झाले आहेत.
कोळीसरे येथील माजी सैनिक म्हणून ओळखले जाणारे आर डी तथा रामचंद्र देमाजी सावंत हे आपल्या अॅक्टिवा दुचाकी गाडीने कोळिसरे ते खंडाळा या ठिकाणी आपल्या खाजगी कामानिमित्ताने चालले होते चालले होते. मात्र कोळिसरे ते खंडाळा असे जात असताना खंडाळा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर जिंदल कंपनीच्या एका बल्गरने पाठीमागून अचानक येऊन त्यांच्या गाडीला ठोकर दिल्याने त्यांचा पाठीमागे बसलेला नातू जागीच गतप्राण झाला .