अमली पदार्थ विक्री करणाऱ्या ३ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 09:07 PM2018-12-17T21:07:40+5:302018-12-17T21:08:11+5:30

हवाला माध्यमातून विदेशातून आलेला पैसा स्वीकारुन कुरिअर कंपन्यांना हे पार्सल विदेशात पाठवण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करण्याचे काम तो करत होता. यामुळे समाजाच्या युवा पिढीवर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन एनडीपीएस न्यायालयाने तीन्ही आरोपींना दोषी ठरवले व त्यांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 

Ten years of imprisonment for three years for selling alcoholic substances | अमली पदार्थ विक्री करणाऱ्या ३ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा 

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या ३ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा 

Next

मुंबई - अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) २०१४ मध्ये अटक केलेल्या तीन आरोपींना नार्कोटिस ड्रग्ज अ‍ॅन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा १९८५ (एनडीपीएस) न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 

डीआरआयने फेब्रुवारी २०१४ मध्ये ९ किलो केटामाईन, साडे तेरा किलो मिथॅम्पफेटामाईन हे अमली पदार्थ जप्त केले होते. लंडनमधून चालवल्या जाणाऱ्या ड्रग्ज माफियांद्वारे भारतातील त्यांच्या हस्तकांद्वारे अन्न पदार्थ असल्याचे घोषित करुन हे अमली पदार्थ लंडनमध्ये निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात होता. अंधेरी येथील व्यायामशाळेत प्रशिक्षक असलेला व लंडनमधून शिक्षण पूर्ण करुन आलेला अलिशान शर्मा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. रात्रीच्या विविध पार्ट्यांमध्ये हशीश व मिथॅम्पफेटामाईनचा वापर केला जात असे. भारतातील विविध भागातील हस्तकांकडून अमली पदार्थ जमा करुन त्याची निर्यात लंडनला केली जात होती. या कामासाठी त्याला विदेशातील व्यक्तीकडून हवालाच्या माध्यमातून मोठी रक्कम मिळत होती. किरण जंगले हा त्याचा साथीदार अमली पदार्थ विविध खाद्य पदार्थाच्या बॉक्समध्ये भरण्याचे काम करत होता. त्यानंतर हे अमली पदार्थ बॉक्समध्ये भरुन कुरिअर कंपनीकडे पाठवण्यात येत होते. त्यांचा तिसरा साथीदार किरण कुमार हा आयटी व्यावसायिक असून डेहराडून येथील निवासी आह. हवाला माध्यमातून विदेशातून आलेला पैसा स्वीकारुन कुरिअर कंपन्यांना हे पार्सल विदेशात पाठवण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करण्याचे काम तो करत होता. यामुळे समाजाच्या युवा पिढीवर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन एनडीपीएस न्यायालयाने तीन्ही आरोपींना दोषी ठरवले व त्यांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 

Web Title: Ten years of imprisonment for three years for selling alcoholic substances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.