Gujarat Accident: गुजरातमध्ये भीषण अपघात; बस-फॉर्च्युनरच्या धडकेत ९ जणांचा मृत्यू, ३२ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 09:04 AM2022-12-31T09:04:51+5:302022-12-31T09:05:15+5:30
लक्झरी बस अहमदाबादहून वलसाडला जात होती. वेसवा गावाजवळ पोहोचताच राष्ट्रीय मार्गावर समोरून फॉर्च्युनर कार आदळली.
थंडीआल्या आल्याच देशभरात अपघातांची मालिका सुरु झाली आहे. गुजरातच्या नवसारीमध्ये बस आणि कारच्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळाहून एकमेकांत अडकलेली वाहने बाजुला केली आहेत. तसेच जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
लक्झरी बस अहमदाबादहून वलसाडला जात होती. वेसवा गावाजवळ पोहोचताच राष्ट्रीय मार्गावर समोरून फॉर्च्युनर कार आदळली. अपघात एवढा भीषण होता की फॉर्च्युनर कारचा चुराडा झाला. मोठमोठ्याने किंचाळणे आणि आरडाओरडा सुरु झाल्याने गावातील लोक जागे झाले आणि घटनास्थळी धावले. यानंतर पोलिसांनाही बोलविण्यात आले व बचावकार्य सुरु झाले.
Gujarat | Several people injured in a collision between a bus and a car in Navsari. Injured admitted to hospital. More details awaited. pic.twitter.com/AFUabv1dSB
— ANI (@ANI) December 31, 2022
फॉर्च्युनरमध्ये अडकलेल्या व बसमधील जखमींना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी ९ जणांना मृत घोषित केले. सर्व मृत कारमधील होते. फॉर्च्यूनर कार डिव्हाडर ओलांडून पलिकडच्या साईडला आली होती. यामुळे समोरून येणाऱ्या बसवर आदळली असे सांगितले जात आहे.
या अपघातात 32 जण जखमीही झाले आहेत. 32 जखमींपैकी 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी वलसाडला रेफर केले. एका जखमीला सुरतला पाठविण्यात आले आहे. अन्य १४ जखमींवर नवसारी येथेच उपचार सुरू आहेत.