भीषण अपघात! मुलाचा नवस फेडण्यासाठी जात होते; टेम्पो पलटून 12 मृत, 41 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 10:00 PM2021-04-10T22:00:37+5:302021-04-10T22:01:05+5:30

Accident News: रस्ते अपघातावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Terrible accident in UP's Itava; 12 dead, 41 injured in tempo mishap | भीषण अपघात! मुलाचा नवस फेडण्यासाठी जात होते; टेम्पो पलटून 12 मृत, 41 जखमी

भीषण अपघात! मुलाचा नवस फेडण्यासाठी जात होते; टेम्पो पलटून 12 मृत, 41 जखमी

Next

इटावा : उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. इटावा जिल्ह्याच्या बढपुरा पोलीस ठाणे क्षेत्रात मिहौली जवळ भाविकांनी भरलेला टेम्पो दरीमध्ये कोसळला. यामुळे 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 41 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Accident in Uttar Pradesh, 12 dead on the spot.)


रस्ते अपघातावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी श्रुती सिंह यांनी सांगितले की, भाविकांनी भरलेला टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिकांनी मदत केली आणि जखमींना वर काढले. यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये हलविले. 


हे भाविक मंदिरावर झेंडा लावण्यासाठी  पिनाहटहून इटावाच्या लखनामध्ये जात होते. तेथे कालका मंदिरावर झंडा लावण्यात येणार होता. जखमींपैकी दोन जणांची तब्येत गंभीर असून त्यांना सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये हलविण्यात आले आहे. 



मुलासाठी बोललेला नवस
आगराचे गाव पिनाहट येथून हे लोक निघाले होते. बैजनाथ बघेल यांनी मुलासाठी नवस बोलला होता. त्यांना मुलगा झाल्याने नवस फेडण्यासाठी ते गावातील लोकांसह कालका देवी मंदिरामध्ये जात होते. गाडीमध्ये जवळपास 60 हून अधिक लोक होते. यामध्ये 20 महिलादेखील होत्या, असे जखमींपैकी एकाने पोलिसांना सांगितले.

Web Title: Terrible accident in UP's Itava; 12 dead, 41 injured in tempo mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात