गँगरेपनंतर अल्पवयीन मुलीने उचलले भयानक पाऊल, प्रियकरासोबत केले असं कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 09:24 PM2022-05-09T21:24:17+5:302022-05-09T21:28:37+5:30
Girlfriend-Boyfriend Consumed Poison After Gang Rape: येथे एका अल्पवयीन मुलीने आणि तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत विष पिऊन जीवन संपवले आहे. मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर त्यांनी हे भयानक पाऊल उचलले.
सामूहिक बलात्कारानंतर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने आणि तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर त्यांनी हे भयानक पाऊल उचलले.
विधवा महिलेवर फेकले अॅसिड; मैत्री, लग्नसाठी टाकत होता दबाव
अल्पवयीन मुलीने प्रियकरासह विष घेतले
16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांना अटक केली आहे. मात्र, या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने प्रियकरासह विष प्यायली. त्यानंतर, मुलगी आणि मुलाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रविवारी मुलाचा मृत्यू झाला आणि मुलीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
शनिवारी रात्री दोघांना एकत्र पाहिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. बिजनौरचे एसपी धरमवीर सिंह यांनी सोमवारी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे आणि आम्ही मुलीच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत माहिती दिलेल्या आणखी दोन मुलांना अटक केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी, मुलीच्या प्रियकराविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६डी आणि ३२८ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ५/६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.