भयंकर! कार खरेदी करून मित्रांसोबत घरी परतत होता; गावच्या १ किमी आधीच झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:17 PM2022-11-05T16:17:02+5:302022-11-05T16:17:15+5:30

गावापासून एक किलोमीटर आधी हा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

Terrible! was returning home with friends after buying a car; Death occurred 1 km before the village | भयंकर! कार खरेदी करून मित्रांसोबत घरी परतत होता; गावच्या १ किमी आधीच झाला मृत्यू

भयंकर! कार खरेदी करून मित्रांसोबत घरी परतत होता; गावच्या १ किमी आधीच झाला मृत्यू

Next

देवरिया - उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात शुक्रवारी रात्री एक अनियंत्रित कार झाडावर आदळली, त्यामुळे कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कार मालकाला जीव गमवावा लागला तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले. कारमध्ये अडकलेल्या या सर्वांना गॅस कटरने कापून बाहेर काढण्यात आले. 

पोलीस अधिकारी भालुआनी ब्रिजेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, मृत कृष्णा वर्मा (वय 25 वर्षे) बरहलगंज येथून जुनी सेकंड हँड कार खरेदी करून गावाकडे परतत होते. गावापासून एक किलोमीटर आधी हा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. कारुआना गावात राहणारे कृष्णा वर्मा (वय २५ वर्षे) सोन्याच्या दागिन्यांचे दुकानदार आहे. शुक्रवारी तो गोरखपूर जिल्ह्यातील बरहलगंज येथे सेकंड हँड कार घेण्यासाठी गेले होते. रात्री स्विफ्ट डिझायर खरेदी करून तो तीन मित्र विकास सिंह (वय २८), नातेवाईक शुभम वर्मा (वय २२) आणि छोटू वर्मा यांच्यासह गावी परतत होता.

शुक्रवारी रात्री ८.३० वाजले होते आणि गाडीचा वेग जास्त होता, तेव्हा गावाच्या अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिवरी गावाजवळ दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि अनियंत्रितपणे कार झाडावर आदळली. या भीषण अपघातात कार मालक कृष्णा वर्मा याचा जागीच मृत्यू झाला तर तीन जखमी मित्रांना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तेथे शुभम आणि छोटू यांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना मेडिकल कॉलेज गोरखपूर येथे रेफर करण्यात आले.

या संदर्भात भलुआनी पोलीस स्टेशनचे अधिकारी ब्रिजेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलीस ताफ्यासह अपघातस्थळी पोहोचले. गाडी झाडात घुसली होती. हा अपघात एवढा भीषण होता की कोणीही गाडीतून बाहेर पडू शकलं नाही. त्यानंतर गॅस कटर बोलवून कारचा पत्रा कापून सर्वांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात कार चालक कृष्ण वर्मा यांचा मृत्यू झाला होता. तर गाडीतील तीन तरुण जखमी झाले.
 

Web Title: Terrible! was returning home with friends after buying a car; Death occurred 1 km before the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात