मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन शहरात पोहचला

By मनीषा म्हात्रे | Published: February 27, 2023 11:13 AM2023-02-27T11:13:25+5:302023-02-27T11:14:28+5:30

NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

Terror attack again on Mumbai?; Sarfaraz Memon, who was trained in Pakistan, reached the city | मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन शहरात पोहचला

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन शहरात पोहचला

googlenewsNext

मुंबई - २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई हादरली होती. या हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनावर ताज्या आहेत. त्यात आता पुन्हा मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं समोर येत आहे. चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेऊन आलेला सरफराज मेमन हा संशयित मुंबईत पोहचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. 

NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरफराज हा मध्यप्रदेशच्या इंदोरचा असल्याचं त्यात म्हटलं आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असून त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व आधारकार्डची कॉपीही NIA कडून पोलिसांना मेल द्वारे पाठवलेली आहे. या संशयित व्यक्तीचा शोध सध्या सर्वत्र सुरू असून सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे.

दहशतवाद्यांना पैसा पुरविणाऱ्यांवर NIA चे छापे
अलीकडेच NIA ने खलिस्तान आणि लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटप्रकरणी कारवाई करताना ७६ ठिकाणी छापे टाकले असून, यात मुंबईतल्या आग्रीपाडा भागातील एका घराचा समावेश आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय संशयिताला समन्स देत त्याची एनआयए टीममकडून चौकशी केली जात आहे. हा संशयित इमिटेशन ज्वेलरीचा व्यापारी आहे आणि तो चीनमधून या ज्वेलरीची आयात व निर्यात करतो. हा पैसा हवालामार्गे अतिरेक्यांना पुरवला जात असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. 

NIA च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई गॅंग आणि गोल्डी बराड यांच्या हवाला लिंक संदर्भात दोन संशयितांना रडारवर ठेवण्यात आले होते. यामुळे चंदीगड एनआयएचे पथक मुंबईत पोहोचले. मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेसह आग्रीपाडा भागातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटवर छापा टाकला. तिथे चौकशीदरम्यान या पथकाला कळले, की त्यांच्या रडारवर असलेल्या मुख्य संशयिताचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे. तो इमिटेशन ज्वेलरी व्यवसायाशी संबंधित होता. हे दागिने तो चीनमधून आयात आणि निर्यात करत असे. ही व्यक्ती अनेक गुन्हेगारी कारवायांशी जोडली गेली असल्याने त्यावर पाळत ठेवण्यात आली होती. 

Web Title: Terror attack again on Mumbai?; Sarfaraz Memon, who was trained in Pakistan, reached the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.