मोठं यश! काश्मीरनंतर जम्मूमधील टेरर फंडिंगचा भांडाफोड; ६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 08:56 PM2020-08-08T20:56:35+5:302020-08-08T20:58:10+5:30
जम्मू-काश्मीर पोलिस हे एक मोठे यश मानत आहेत. त्यांची विचारपूस केल्यानंतर आणखी काहींना अटक केली जाऊ शकते असा दावा पोलिसांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरनंतरजम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मूमधील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या टेरर फंडिंग मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. विशेष कारवाई दरम्यान जम्मूमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या सहा साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. जम्मू-काश्मीर पोलिस हे एक मोठे यश मानत आहेत. त्यांची विचारपूस केल्यानंतर आणखी काहींना अटक केली जाऊ शकते असा दावा पोलिसांनी केला आहे.
जम्मू-काश्मीर पोलिस, जम्मूचे आयजी मुकेश सिंग यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देताना सांगितले की, अटक केलेले सर्व आरोपी लष्कर-ए-तैयबाला मदत पुरवित होते. जम्मूमध्येही लष्कर-ए-तैयबासाठी एक टेरर मॉड्यूल कार्यरत होते, हे काही दिवसांपूर्वी त्यांना त्याच्या विश्वसनीय स्त्रोतांकडून कळले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी पथकाने नियोजन केले आणि त्या माहितीच्या आधारे मुदसीर फारुख भट याला छापा टाकून अटक केली. आयजीपी म्हणाले की, भट याची काटेकोरपणे चौकशी केली असता त्यांनी आपल्याबरोबर सहभागी असलेल्या आणखी पाच लोकांची नावे दिली.
तौकीर अहमद भट, आसिफ भट, खालिद लतीफ भट, गाझी इक्बाल आणि तारिक हुसेन मीर अशी त्यांची नावे आहेत. एसओजी पथकाने नमूद केलेल्या पत्त्यावर छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत सर्व सहा आरोपींनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे कबूल केले आहे. त्यांची चौकशी सुरूच आहे.
जम्मूमध्ये या संघटनेशी संबंधित आणखी बरेच लोक असू शकतात असा दावा आयजीपीने केला आहे. चौकशीच्या आधारे जम्मूमधील दहशतवादी संघटनांना मदत करणारे संपूर्ण जाळे लवकरच उघडकीस आणले जाईल आणि सर्व विश्वासघात करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल. आगामी काळात लष्कर ए तैयबा काहीतरी मोठा घातपात करण्याचा विचार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
We don't have any specific information regarding any activity that they were planning on the 5th or 15th of August, but yes the attempt was to reactivate and probably, they were planning something bigger in future: Mukesh Singh, Inspector General of Police, Jammu pic.twitter.com/xEXs7XlZdC
— ANI (@ANI) August 8, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या
सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी
सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा
Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग
भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी
Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड