मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? एनआयएच्या सूचनेने सुरक्षा यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:50 AM2023-02-28T06:50:08+5:302023-02-28T06:50:33+5:30

‘डेंजरस मॅन’ या नावाने पाठवलेल्या या संदेशात एनआयएने काही तपशीलही तपासयंत्रणांना पुरवला आहे.

Terrorist attack on Mumbai? Security system alerted by NIA | मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? एनआयएच्या सूचनेने सुरक्षा यंत्रणा अलर्ट

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? एनआयएच्या सूचनेने सुरक्षा यंत्रणा अलर्ट

googlenewsNext

- आशिष सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेली इंदूर येथील सर्फराज मेमन ही संशयास्पद व्यक्ती सध्या मुंबईत पोहोचली असून, तो घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा संदेश राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) ई-मेलद्वारे पाठविल्याने मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांचीही झोप उडाली आहे. या सर्फराज मेमनला हुडकून अटक करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. 

‘डेंजरस मॅन’ या नावाने पाठवलेल्या या संदेशात एनआयएने काही तपशीलही तपासयंत्रणांना पुरवला आहे. त्यानुसार इंदूरच्या धाररोड परिसरात राहणारा सर्फराज मेमन हा ४१ वर्षांचा असून, त्याच्या पासपोर्टवर २०१८-२०१९ वर्षातील चीनला भेट दिल्याचा शिक्का आहे. त्याच्या पासपोर्टचा अधिक तपशील तपासयंत्रणांकडून गोळा केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

रविवारी एनआयएला या संदर्भात एक मेल बेनामी ई-मेल आयडीद्वारे आला होता. त्यात या सर्फराज मेमनचा उल्लेख करीत त्याचे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, लिव्हिंग सर्टिफिकेटचा तपशील जोडण्यात आला होता. ही सारी माहिती एनआयएने सर्व तपास यंत्रणांना पाठवत सर्फराजला रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Terrorist attack on Mumbai? Security system alerted by NIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.