Terrorists attack in Sopore: काश्मीर खोरे हादरले! सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 15:12 IST2021-03-29T15:09:37+5:302021-03-29T15:12:33+5:30
Terrorists attack in Sopore: बीडीसीचे अध्यक्ष फरीदा खान यांच्यावर हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात फरिदा खार जखमी असून त्यांना त्याच परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्य़ात आला आहे.

Terrorists attack in Sopore: काश्मीर खोरे हादरले! सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू
जम्मू काश्मीरच्या सोपोर भागात एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. सोपोरच्या बीडीसी अध्यक्षावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एका पीएसओसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी परिसरावर ताबा मिळविला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. (A councillor and a cop died after terrorists attacked a councillors' meeting, chaired by BDC Chairperson Fareeda Khan, in Kashmir's Sopore.)
बीडीसीचे अध्यक्ष फरीदा खान यांच्यावर हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात फरिदा खार जखमी असून त्यांना त्याच परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्य़ात आला आहे. मृतांमध्ये एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यात किती दहशतवादी होते, कोणत्या संघटनेने हा हल्ला केला हे अद्याप समजलेले नाही. हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांनी पळ काढला. ते याच भागात लपले असण्याची शक्यता आहे. सुरक्ष दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.