Pakistan Terrorist Module: पाकिस्तानात घेतलं होतं रेल्वे ब्रिज उडवण्याचं ट्रेनिंग, ९३च्या सीरियल ब्लास्टसारखा होता प्लान, तपासात मोठे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:24 PM2021-09-16T14:24:12+5:302021-09-16T14:25:05+5:30
दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी नुकताच उधळून लावला.
दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी नुकताच उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ६ दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एक मुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं या धारावीतील संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. या सर्वांची दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून ( Delhi Police Special Cell) कसून तपास सुरू आहे आणि यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल ( Pakistan Terrorist Module) उधळून लावल्यानंतर आता आणखी नवीन खुलासे होत आहेत.
Delhi Police Special Cellच्या सूत्रांच्या माहितीनुसार या दहशतवाद्यांना रेल्वे लाईन आणि ब्रिज उडवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. याचसह गर्दीची ठिकाणंही त्यांच्या टार्गेटवर होती. या प्रकरणात आता स्लीपर सेलची भूमिकाही समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे दहशतवादी पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी गेले होते, परंतु त्यांच्या पासपोर्टवर तसा कोणताच स्टॅम्प नाही. त्यांनी समुद्री मार्गाचा पर्याय निवडला होता. ओमानहून पाकिस्तानाता जातावेळी त्यांनी मध्येच बोटही बदलली होती. (The terrorists who were part of the recently busted Pak-organised terror module were given training in blowing up railway tracks and bridges. Large gatherings were also on their target. The role of sleeper cells has also emerged: Delhi Police Special Cell sources)
The terrorists who were part of the recently busted Pak-organised terror module were given training in blowing up railway tracks and bridges. Large gatherings were also on their target. The role of sleeper cells has also emerged: Delhi Police Special Cell sources
— ANI (@ANI) September 16, 2021
हे दहशतवादी १९९३च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टसारखीच योजना आखण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांची रेकी केल्यनंतर एकत्र यायचे होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या धमाक्यासाठी ते RDXचा वापर करणार होती. या लोकांना ओमान येथून एका बोटीतून समुद्रीमार्गानं इराणच्या समुद्री सीमेपर्यंत आणले गेले आणि त्यानंतर दुसऱ्या बोटीतून गांदरबल येथे पोहोचले. तेथून त्यांना एका फार्महाऊसवर नेण्यात आले. तेथे त्यांना ट्रेनिंग दिले गेले आणि १५ दिवस तेथे थांबल्यानंतर त्यांना भारतात सीरियल ब्लास्टचा टास्क देऊन परत पाठवण्यात आले.
आता दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल ओसामाचे काका हुमैद याचा तपास घेत आहेत. तो परदेशात पळून जाऊ नये यासाठी त्याच्याविरोधात LOC जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. ओसामाचे वडिलांना दुबईतून भारत आणण्यासाठी रेड कॉर्नर नोटिसही पाठवण्याची सीबीआयनं तयारी केली आहे.
Investigation reveals that the planning by Pak-organised terror module was on the pattern of 1993 Mumbai serial blasts. People from separate locations were supposed to meet together after conducting recce of different locations: Delhi Police Special Cell sources
— ANI (@ANI) September 16, 2021
Even though two terrorists (part of Pak organised terror module) travelled to Pakistan there was no stamp on their passports. They opted for the sea route through Gwadar Port, also changed motor boats while enroute towards Pakistan from Oman: Delhi Police Special Cell sources
— ANI (@ANI) September 16, 2021