टीईटी गैरव्यवहार : तुकाराम सुपे, प्रीतीश देशमुख यांचे प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 08:34 AM2022-01-30T08:34:47+5:302022-01-30T08:41:15+5:30

TET Scam : अपात्र परीक्षार्थिंना पात्र करण्यासाठी त्यांनी प्रीतीश देशमुख याच्या सूचनेप्रमाणे अपात्र परीक्षार्थींना पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगितले होते, असे तपासातून पुढे आले आहे.

TET malpractice: Pratap of Tukaram Supe, Pritish Deshmukh | टीईटी गैरव्यवहार : तुकाराम सुपे, प्रीतीश देशमुख यांचे प्रताप

टीईटी गैरव्यवहार : तुकाराम सुपे, प्रीतीश देशमुख यांचे प्रताप

googlenewsNext

पुणे : टीईटी गैरव्यवहारात सायबर पोलिसांनी शनिवारी शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. अपात्र परीक्षार्थिंना पात्र करण्यासाठी त्यांनी प्रीतीश देशमुख याच्या सूचनेप्रमाणे अपात्र परीक्षार्थींना पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगितले होते, असे तपासातून पुढे आले आहे.
 टीईटी गैरव्यवहारात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. काही जणांनी दोन, तीन प्रश्न सोडविले; पण त्यांना ८४, ८२ असे मार्कस् देऊन पास करण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे.
जी. ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतिश देशमुख याने वरिष्ठांना हाताशी धरून एजंटांमार्फत शिक्षकांशी संधान साधले होते. जे परीक्षार्थी पैसे देण्यास तयार होतील व पैसे देतील, त्यांना परीक्षेला गेल्यावर ओएमआर शीट कोरे ठेवायला सांगत. त्यानंतर प्रत्यक्ष पेपर तपासणीच्या वेळी हे ओएमआर शीट भरून या परीक्षार्थींना पास करायचे, असा हा संपूर्ण प्लॅन होता. मात्र, हे सर्वजण भ्रष्टाचाराबाबत इतके निर्ढावले की, त्यांनी अनेकांचे ओएमआर शीट भरलेच नाही. त्यांना थेट पास केले. सायबर पोलिसांनी ही सर्व शीट ताब्यात घेतली. त्यातील पात्र ठरलेल्या परीक्षार्थींची ओएमआर शीटची तपासणी सुरू केली तेव्हा त्यातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. परीक्षार्थींना शीट कोरे ठेवायला सांगितले असल्याने काहींनी किरकोळ ठिकाणी खुणा केल्या. पण, पैसे घेतल्यानंतर या परीक्षार्थींची ही कोरी शीट न भरताच त्यांची गुणवाढ केल्याचे बहुतांश शीटमध्ये दिसून आले आहे. काही जणांनी दोन, तीन प्रश्न सोडविले; पण त्यांना ८४, ८२ असे मार्कस् देऊन पास करण्यात आल्याचे तपासात आढळले आहे.
टीईटीच्या २०१९- २० परीक्षेतील अपात्र ७ हजार ८८० परीक्षार्थींना अशा प्रकारे पात्र करण्यात आले आहे.

२०१८ मध्ये पुनर्मूल्यांकनात केले पात्र
टीईटीच्या २०१८ मधील परीक्षेमध्येही अपात्र परीक्षार्थींना पात्र करून घेण्यात आले असून, त्यांच्याही ओएमआर शीटची तपासणी सध्या सुरू आहे. यामध्ये ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले होते; पण ते अपात्र ठरले. त्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायला सांगितले. त्यांचा ओएमआर शीट पुनर्मूल्यांकन करताना त्यांना पास करून पात्र केल्याचे आढळले आहे.

Web Title: TET malpractice: Pratap of Tukaram Supe, Pritish Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.