ठाणे पोलिसांनी १० गुंडांविरुद्ध तयार केला मकोकाचा प्रस्ताव; टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 01:14 AM2018-10-11T01:14:48+5:302018-10-11T01:14:54+5:30

ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ४५ नामचीन गुंडांच्या हद्दपारीचा तर १० जणांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय, आगामी निवडणुका आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत धंदे आणि हाणामारी तसेच मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार करण्यात आली आहे.

Thakur police made MCOCA proposal against 10 gangsters; Top ten criminals list ready | ठाणे पोलिसांनी १० गुंडांविरुद्ध तयार केला मकोकाचा प्रस्ताव; टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार

ठाणे पोलिसांनी १० गुंडांविरुद्ध तयार केला मकोकाचा प्रस्ताव; टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ४५ नामचीन गुंडांच्या हद्दपारीचा तर १० जणांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय, आगामी निवडणुका आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत धंदे आणि हाणामारी तसेच मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार करण्यात आली आहे. या सर्व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे ग्रामीणच्या शहापूर, मुरबाड, गणेशपुरी, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांतील १७ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीचा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी नुकताच आढावा घेतला. त्यानुसार वारंवार हाणामारी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, दरोडे
असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये
शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा ४० ते ४५ नामचीन गुंडांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना
ठाणे जिल्ह्यातून हद्दपारीचा
प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे पाठविण्यात येणार आहे. यामध्ये सुनावणीदरम्यान जास्तीतजास्त गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई होण्याची शिफारस ठाणे
ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येणार आहे. यामध्ये मालमत्तेचे
आणि जीवाला धोका करणाºया सराईत गुन्हेगारांचा समावेश करण्यात आला आहे. एकट्या मीरा रोड विभागातून १२ गुंडांवर हद्दपारीचा प्रस्ताव आहे.
याशिवाय, सोनसाखळी जबरी चोरीसारख्या संघटित गुन्हेगारी कारवाया करणाºया, हाणामारी, हत्याराच्या धाकावर लुटमार करणाºया टोळ्यांवरही मकोकाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पाचही विभागांतून दहा जणांचा प्रस्ताव असून एकट्या मीरा रोड विभागातून तीन जणांचे प्रस्ताव तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुगारी, गावठी दारूचे
अवैध विक्रेते, हाणामारीचा गुन्हा वारंवार करणारे आणि
मालमत्तेचे (चोरी आणि नुकसान) गुन्हेगार आणि या प्रत्येक गुन्ह्यातील टॉप टेन गुन्हेगारांचीही
यादी बनविण्यात आली आहे. एखादा गुन्हा ठाणे ग्रामीण, शहर नवी
मुंबई, पालघर किंवा मुंबई शहरातही घडल्यानंतर ही यादी संबंधित पोलिसांच्या मागणीनंतर
त्यांच्याकडे दिली जाणार आहे. शिवाय, ठाणे ग्रामीणच्या
स्थानिक गुन्हे शाखेकडूनही या गुन्हेगारांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

कुख्यात गुन्हेगारांवर हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून जास्तीतजास्त गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गुन्हेगारांच्या टॉप टेन कुंडलीमुळे त्यांच्यावर वॉच ठेवणे सोपे जाणार असून गुन्हे नियंत्रण आणि उघड होण्यालाही मदत होईल.
- डॉ. शिवाजी राठोड,
पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

Web Title: Thakur police made MCOCA proposal against 10 gangsters; Top ten criminals list ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.