ठाणे खंडणी पथकाची कारवाई, बेकायदेशीर शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 03:31 PM2020-03-20T15:31:04+5:302020-03-20T15:33:13+5:30

ही कारवाई गुरुवारी रात्री केली असून त्याला येत्या २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Thane anti extortion team action, arrested for illegal weapons sale pda | ठाणे खंडणी पथकाची कारवाई, बेकायदेशीर शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

ठाणे खंडणी पथकाची कारवाई, बेकायदेशीर शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

Next
ठळक मुद्दे एका बंदुकासह आठ जीवंत काडतुसे जप्तगौतम दशरथ तांगडी (४२) याला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी पथकाने अटक केली. तो कोणाला विक्रीसाठी आला होता याचा तपास खंडणी विरोधी पथक करत आहे.

ठाणे - विनापरवाना बेकायदेशीर अग्निशस्त्रसाठा विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील गौतम दशरथ तांगडी (४२) याला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एका बंदुकासह आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री केली असून त्याला येत्या २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


आय 20 या कारमधून एक जण विनापरवाना बेकायदेशीर शस्त्रसाठा विक्रीसाठी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम,खारटन रोड येथे येणार असल्याची ठाणे खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून गौतम याला पकडले. त्याच्याकडून शस्त्रसाठा हस्तगत करत त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ठाणे न्यायालयात हजर केले असता, त्याला २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मिळून आलेला शस्त्रसाठा त्याने कुठून आणला आणि तो कोणाला विक्रीसाठी आला होता याचा तपास खंडणी विरोधी पथक करत आहे.

Web Title: Thane anti extortion team action, arrested for illegal weapons sale pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.