सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस १ वर्ष कैदेची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 08:47 PM2022-07-28T20:47:35+5:302022-07-28T20:48:08+5:30
Sex racket : दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षाही तिला भोगावी लागणार आहे.
ठाणे : काशीमीरा भागातील आपल्याच घरामध्ये काही मुलींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणाºया एका महिलेला ठाणेन्यायालयाने एक वर्षांच्या कैदेची तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षाही तिला भोगावी लागणार आहे.
यातील आरोपी महिला ठाण्याच्या काशीमीरा भागातील आपल्याच घरामध्ये काही मुलींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती काशीमीरा पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २०१५ मध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांच्या तिच्या घरात छापा टाकून तिला अटक केली होती. तिच्याकडून पाच हजाराच्या रोकडसह काही आक्षेपार्ह सामुग्री हस्तगत केली होती. याप्रकरणी तिच्या विरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला होता. याच खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. पाटील यांच्या न्यायालयात झाली. तेंव्हा विशेष सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक काकडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून तर न्यायालयीन कामकाज अंमलदार म्हणून पोलीस हवालदार शशी पाटील यांनी काम पाहिले.