Thane Crime | एका रात्रीत नियम मोडणाऱ्या दीड हजार वाहन चालकांवर कारवाई, ११ लाखांचा दंड वसूल

By जितेंद्र कालेकर | Published: December 30, 2022 11:00 PM2022-12-30T23:00:53+5:302022-12-30T23:01:31+5:30

११ लाखांचा दंड वसूल, ठाणे शहर वाहतूक शाखेची कारवाई

Thane Crime Action taken against 1500 drivers in single night who broke traffic rules | Thane Crime | एका रात्रीत नियम मोडणाऱ्या दीड हजार वाहन चालकांवर कारवाई, ११ लाखांचा दंड वसूल

Thane Crime | एका रात्रीत नियम मोडणाऱ्या दीड हजार वाहन चालकांवर कारवाई, ११ लाखांचा दंड वसूल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या तब्बल एक हजार ७९० वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ऑपरेशन ऑल आऊटद्वारे कारवाई केल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी शुक्रवारी दिली. याद्वारे चालकांकडून ११ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ठाणे शहर वाहतूक शाखेच्या चार विभागांमध्ये  १८ युनिटसह विशेष भरारी पथकाने २९ डिसेंबर रोजी रात्री ९ ते ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत या मोहिमेद्वारे दोन हजार ८५१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार  ७९० वाहनांच्या चालकांविरुध्द्र वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे  दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये मद्य प्राशन करुन वाहन चालविणाºया १४० चालकांवर थेट न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. जादा प्रवासी  नेणारे किंवा भरघाव वेगाने रिक्षा दामटणाºया ३५७ चालकांकडून दोन लाख ६० हजारांचा दंड वसूल केला.

याशिवाय, विना परवाना वाहन चालविणारे ८६, गणवेश परिधान करणारे १०६ चालकांवर कारवाई झाली. तर विना हेल्मेट मोटार सायकल चालविणाºया ५८२ चालकांवर तीन लाखांच्या दंडाची कारवाई करण्यात आली. याशिवाय, सिग्नल तोडणारे २८, वाहन चालवितांना मोबाईल बोलणारे १६ तर मोटार कार चालवितांना सीट बेल्ट न लावणाºया ८१ चालकांकडून एक लाख ७१ हजारांचा दंड घेण्यात आला. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे उपायुक्त राठोड यांनी सांगितले.

Web Title: Thane Crime Action taken against 1500 drivers in single night who broke traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.