पालिकेच्या लिपिकाला १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 07:41 PM2019-06-04T19:41:28+5:302019-06-04T19:42:49+5:30
तडजोडीअंती २० हजार लाचेची रक्कम ठरली
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा प्रभागाच्या अतिक्रमण विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या रत्न बहिराव (५३) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.
तक्रारदार यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी रतन रेवजी बहिराव याने तक्रादार यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २० हजार लाचेची रक्कम ठरली. मात्र, तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची ३ जूनला पडताळणी एसीबीने केली असता पालिकेच्या लिपिकाने लाचेची मागणी केली असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार ठाणे युनिटने सापळा रचून लाचेचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज १.३९ वाजताच्या सुमारास बहिरावला एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे.
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा प्रभागाच्या अतिक्रमण विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या रतन बहिराव यांना एसीबीने लाच घेताना केली अटक https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2019