ठाणे पोलिसांची मध्यप्रदेशमधील कॉल सेंटरवर करवाई ; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 02:59 PM2019-07-20T14:59:25+5:302019-07-20T14:59:44+5:30
ठाणे: शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो सांगून सव्वा 2 लाखांची फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशमधील दुकलीला ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेश येथून ...
ठाणे: शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो सांगून सव्वा 2 लाखांची फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशमधील दुकलीला ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेश येथून अटक केली.
अरविंद चौहान (26) आणि तपेश शर्मा (२२) असे अटकेतील दुकलीचे नाव आहे. त्यांचे मध्यप्रदेश येथे कॉल सेंटर असून ते देशभरातील अनेक नागरिकांशी बनावट सिम कार्ड द्वारे संपर्क करुन शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो, आपलेकडे डी मॅट खाते उघडा असे सांगत. त्यानंतर बनावट बँक खात्यामध्ये रक्कम भरण्यास सांगत. भरलेली रक्कम शेअर मार्केट मध्ये न् भरता लोकांची फसवणूक केली होती.
याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील तपास कळवा पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्याकडून वापरातील संगणक मधील 59 हार्ड डिस्क , 26 वायरलेस फोन , 4 भ्रमण ध्वनी व इतर कागदपत्रे हस्तगत केले आहेत.या दुकालीने देशभरातील अनेक नागरिकांची सुमारे 1 कोटिंहुन अधिक रुपयांची फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कुंभारे यांनी दिली. ही करवाई कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने केली आहे.