ठाणे पोलिसांची मोठी कारवाई : गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; 105 चोरीच्या गाड्या जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 07:21 PM2019-02-07T19:21:38+5:302019-02-07T19:22:08+5:30

या कारवाईत १०५ चोरीच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

Thane police crackdown: Interstate gang robbery; 105 stolen vehicles seized | ठाणे पोलिसांची मोठी कारवाई : गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; 105 चोरीच्या गाड्या जप्त 

ठाणे पोलिसांची मोठी कारवाई : गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; 105 चोरीच्या गाड्या जप्त 

ठाणे - ठाणे व आजूबाजूच्या परिसरात चारचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर व पोलीस सह आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून  गाड्या चोरणारी मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत १०५ चोरीच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

राबोडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा 379 प्रमाणे या बाबत गुन्हा दाखल झाला होता.  त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरिक्षक महेश जाधव करत होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणअंती आपल्या पथकास पुण्याला जाऊन त्यांनी चोरीला गेलेली महेंद्र बोलेरो पिकअपचा शोध लाऊन ती ताब्यात घेतली.  यात आणखी गाड्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी त्याची तात्काळ माहीती अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस .स्वामी यांना दिली. त्यांनी दिलेल्या सूचनेवरून वेगवेगळे पाच पथक तयार करून वाहन चोरणारे, चोरीचे वाहान खरेदी करणारे, चोरीच्या वाहानामध्ये इंजिन व चेसीस मध्ये फेरफार करणारे, नागालँड येथून वाहानाचे आरसीबुक बनवणारे, बेळगाव कर्नाटक, राजस्थान येथे चोरीचे वाहान विकणारे एजंट अशा एकूण 9 जणांना अटक करण्यात आली.  संदीप मुरलीधर लागू राहणार मुंबई महाराष्ट्र, सादिक मेहबूब खान मुल्ला राहणार बेळगाव कर्नाटक, अल्ताब अब्दुलगणी गोकाक राहणार बेळगाव कर्नाटक, विनीत रतन माधीवाल राहणार मुंबई महाराष्ट्र, मांगीलाल शुभनाराम जाखड नागौर राजस्थान, जावेद उर्फ बबलू मख्तार खान प्रतापगड उत्तर प्रदेश, अल्ताब एक्बाल कुरेशी राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश, मोहम्मद युसूफ नईम खान प्रताप गड उत्तर प्रदेश अशा या आरोपींची नाव आहेत. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपींकडून 170 चोरीच्या वाहनांची माहिती पोलीसांना मिळाली. त्यांची तांत्रिक माहिती मिळवून त्यातील 105 वाहान चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यातील एकूण 80 वाहने जप्त करण्यात आली. त्यामध्ये 69 महिंद्रा पिकअप, 8 महिंद्रा बलेरो, 1 होंडा सिटी, 1 वेर्णा, 1 ब्रीझा असा सुमारे 3 कोटी 40 लाख रुपये किंमतीची वाहने पोलिसांनी जप्त केली .

गाड्या चोरणाऱ्या या टोळीमध्ये संदीप मुरलीधर लागू हा त्यांचा सूत्रधार असून दुसरा आरोपी विनीत रतन माधीवाल याची आई बारबाला आहे व तिचे सबंध संदीप मुलारीधर लागू याच्या बरोबर होते.  तिच्या मार्फत संदीप लागूची  इतर आरोपींबरोबर ओळख झाली. या सगळ्यांची मिळून संदीप लागू याने गाड्या चोरणारी आंतरराज्यीय  टोळी बनवली.  ही टोळी महाराष्ट्रामध्ये ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई शहर, नवी मुंबई, पालघर, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, गुजरात या ठिकाणाहून वाहाने चोरी करून पुणे येथे एका गोडाऊन मध्ये ठेवत असत. त्यानंतर त्या गाड्यांचे चेसीस व इंजिन नंबर यात बदल करून नागालँड येथून वाहनांचे आरसी बुक बनवुन ते वाहान कर्नाटक व राजस्थानमध्ये एजंटमार्फत लोकांना विकत असत, अशी माहिती सहआयुक्त मधुकर पांडे यांनी दिली. 

Web Title: Thane police crackdown: Interstate gang robbery; 105 stolen vehicles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.