बलात्कार गुन्ह्यातील आरोपी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहताला अटक करण्यात पोलीस अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 07:50 PM2020-02-29T19:50:13+5:302020-02-29T20:08:14+5:30
पिडीत भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी २८ रोजी पहाटे मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केल्या पासुन दोघेही आरोपी पोलीसांच्या हाती लागलेले नाहित.
मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचा माजी आमदार नरेंद्र मेहतासह त्याचा साथीदार संजय थरथरेला अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलीस अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे पिडीता नगरसेविकेला फोन वरुन धमक्या देण्यात आल्याने मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे भाजपा नगरसेवकाच्या गाडी सोबत मुंबई - पुणे एक्सप्रेस- वेवर असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीसांची तारांबळ उडाली आहे. आरोपींचे पोलीसांशी असलेले संबंध तसेच आधीपासुन पोलीसांची अन्य काही प्रकरणात असलेली बोटचेपी भूमिका यामुळे आरोपी पळुन गेल्याचे आरोप होत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील, पोलीसांना आरोपी पकडायचे आहेत की नाही ? अशी शंका उपस्थित केली आहे.
पिडीत भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी २८ रोजी पहाटे मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केल्या पासुन दोघेही आरोपी पोलीसांच्या हाती लागलेले नाहित. मुळात सदर प्रकरणी २५ रोजी तक्रार झाल्या पासुन गुन्हा दाखल होण्याची चिन्हे असताना देखील आरोपी मेहता व थरथरे च्या हालचालीवर पोलीसांनी लक्ष ठेवले नाही जेणे करुन आरोपी पसार झाले. महत्वाचे म्हणजे शुक्रवारी मेहता व थरथरे हे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली येथील भैरवी फूड कॉर्नरच्या आवारात भाजपा नगरसेवक प्रशांत दळवीच्या आलिशान ५२५२ क्र. मोटार सोबत दिसुन आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलीस तेथे रवाना झाले.
पोलीसांनी नगरसेवक दळवी यास पोलीस ठाण्यात बोलावुन आरोपींना गाडी दिल्या बाबत चौकशी करुन जबाब नोंदवुन घेतला आहे. तर आरोपींना पळुन जाण्यास मदर करणाराया दळवीवर गुन्हा दाखल करुन गाडी जप्त करण्याची मागणी आ. सरनाईक यांनी केली आहे. पोलीसांना जेव्हा हवे असतात तेव्हा आरोपी बरे सापडतात. पण मेहता व थरथरेना अटक करण्याची पोलीसांची इच्छा आहे का ? अशी शंका सरनाईकांनी व्यक्त केली आहे.
मेहता व थरथरे वर गुन्हा दाखल केल्याने पिडीत नगरसेविकेस दोन अनोळखी भ्रमणध्वनी वरुन धमक्यांचे फोन आले आहेत. या बाबत मीरारोड पोलीस ठाण्यात त्या भ्रमणध्वनी क्रमांकासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहता व थरथरे यांचे ठाणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक अधिकारी - कर्मचारायांशी सलोख्याचे संबंध आहेत. अधिकारी व कर्मचारायां सोबतचे आरोपींचे फोटो देखील चर्चेत आहेत. शिवाय गेल्या ५ वर्षातील पोलीसांच्या मेहता व थरथरे बाबतच्या भुमिकेचा अनेकांना वाईट अनुभव असल्याने ठाणे ग्रामीण पोलीसच संशायच्या वर्तुळात आहेत.
पिडीताच्या फिर्यादी नुसार मंदिरात लग्न केले ती मेहतां पासुन गर्भवती राहिली असताना जानेवारी २००३ मध्ये मेहताने सुमन सिंग सोबत लग्न केले. तर २२ मार्च २००३ रोजी पिडीता बाळंत झाली. पण नगरसेवक आणि दुसरे लग्न झाल्या नंतर मात्र मेहताने पिडीता व नवजात बाळा कडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. जातीचा प्रश्न तसेच राजकिय कारकिर्दीवर विपरीत परिणाम होईल म्हणुन लग्न व मुलास स्विकारण्यास नकार देत शिवीगाळ केली. पण त्यानंतर देखील नगरसेवक पद व सत्तेचा धाक तसेच पिडीतेस मारहाण करुन बाळासह मारुन टाकण्याची धमकी देत लैंगिक शोषण सुरुच ठेवले.
२००९ च्या विधानसभा निवडणुकी वेळी मेहताने पिडीतेला नोकरी सोड सांगुन निवडणुकीत मदत करायला सांगीतले. पिडीतेने निवडुकीत मेहताला मदत केली तसेच दबावाखाली सांगेल तसे वागु लागली. मेहता त्याच्या फायद्यासाठी पिडीतेचा वापर करत होताा व २०१२ साली तिसरायांदा नगरसेवक झाला. दरम्यान पिडीतेने स्वत:चा व्यवसाय सुरु केला.
मेहताचा राजकिय दबदबा वाढु लागल्याने ती दबावाखालीच राहु लागली. २०१५ मध्ये आमदार मेहताने पिडीतेस नागपुर अधिवेशनला बोलावुन तीचे विमान तिकीट काढल्याचे सुमन मेहतांना कळल्या नंतर बराच वाद झाला होता. पिडीतेच्या मुलास सुमन यांनी त्यांच्या शाळेतुन काढुन टाकले. मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल केल्यावर न्यायालयाने पिडीतेच्या मुलास शाळेत घेण्याचे आदेश दिले. त्याला शाळेत घेतले पण नंतर त्याची तुकडी बंद करण्यासह फुटबॉल संघाच्या कप्तान पदावरुन सुमन यांच्या शाळेने मुलास काढुन टाकले.
मुलावर त्याचा विपरीत परिणाम होऊन देखील वडिल म्हणुन मेहताने काहीच केले नाही. त्याचवेळी मेहताचा मित्र संजय थरथरे याने थेट पिडीतेच्या कार्यालयात जाऊन मेहता सांगेल तसं वाग, त्याच्या विरोधात जाणे महागात पडेल. तो सिएमचा खास असुन सत्तापण त्याची असल्याने तुला महागात पडेल अशी धमकी दिली. तसेच मुलासह दुबईला निघुन जाण्यास सांगीतले. घाबरुन ती मुलासह निघुन गेली पण आठवड्याभराने परत आली.
मुलगा हा मेहताचा असल्याने पिडीता कायदेशीर तक्रार करेल असे वाटल्याने मेहताने नेहमीच सत्ता आणि पदा मुळे दबाव व धाकात ठेवले. तसेच लैंगिक शोषण सुरु ठेवले प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात नरेंद्र लालचंद मेहता ( ४८ ) सह त्याचा साथीदार संजय थरथरे विरुध्द शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहता हे विरोधी पक्षनेते तथा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. मेहता सातत्याने वादग्रस्त राहिले असुन त्यांच्यावर आता पर्यंत सुमारे २० च्या घरात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.