ठाणे ग्रामीण पोलीस संशयाच्या भोवऱ्यात; मेहता प्रकरणी आरोपीला अजूनही अटक नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 09:54 PM2020-03-10T21:54:08+5:302020-03-10T21:55:14+5:30

२८ फेब्रुवारीच्या पहाटे भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केला होता.

Thane Rural Police Surround in Suspicion; The accused is still not arrested in the Mehta case | ठाणे ग्रामीण पोलीस संशयाच्या भोवऱ्यात; मेहता प्रकरणी आरोपीला अजूनही अटक नाही

ठाणे ग्रामीण पोलीस संशयाच्या भोवऱ्यात; मेहता प्रकरणी आरोपीला अजूनही अटक नाही

Next

मीरारोड - भाजपाचा माजी आमदार नरेंद्र मेहता सह त्याचा साथीदार संजय थरथरे वर दाखल बलात्कार व एट्रॉसीटीच्या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीण पोलीसांकडेच आहे. १२ दिवस झाले तरी दुसरा आरोपी पोलीसांना सापडलेला नाही. मेहता देखील पोलीसांना सापडला नव्हता.

५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने, मेहता तपासात सहकार्य करत असल्यास कठोर कारवाई करु नका असे आदेश देत दिलासा दिला होता. आता साथीदार थरथरेने देखील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागीतली असुन बुधवारी त्यावर सुनावणी आहे. त्यामुळे एकुणच ठाणे ग्रामीण पोलीसांच्या भुमिके बद्दल संशय व्यक्त होत आहे. तर मेहताला तपासकामी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलीसांनी बजावली असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

२८ फेब्रुवारीच्या पहाटे भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केला होता. परंतु ठाणे ग्रामीण पोलीसांना १२ दिवस उलटले तरी थरथरेचा ठाव ठिकाणा लागलेला नाही. तर मेहता देखील पोलीसांच्या हाती न लागता ५ मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर शहरात फिरु लागला आहे. त्यातच आता थरथरे याने देखील उच्च न्यायालयात दाद मगीतली असुन उद्या बुधवार ११ मार्च रोजीची तारीख सुनावणीसाठी दिली आहे.

वास्तविक मेहता व थरथरे यांचे ठाणे ग्रामीण पोलीसांशी हितसंबंध आहेत. पोलीसांनी अनेक प्रकरणात आरोपींना पुर्वी देखील पाठीशी घालण्याचे काम केले आहे. तक्रारींची दखल न घेणे, तक्रार असताना गुन्हा दाखल न करणे, त्यांना अटक न करणे आदी अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत. ठाणे ग्रामीण पोलीसांच्या वरिष्ठ अधिकारायां सोबत आरोपींचे घनिष्ठ संबंध असल्याचे काही व्हायरल फोटों वरुन दिसुन आले आहे. मेहता वर अनेक गुन्हे दाखल असुन देखील दोन दोन कार्बाईनधारी पोलीस बंदोबस्ताला दिलेले होते. या बाबतच्या तक्रारी देखील वरिष्ठ पोलीस अधिकारायां पासुन शासन स्तरावर झालेल्या आहेत.

आरोपी हे भाजपा नगरसेवक प्रशांत दळवीची गाडी घेऊन फिरत असल्याचे एका जागरुक नागरिकाने काढलेल्या व्हिडिओ मुळे पोलीसांना माहिती मिळाली होती. नंतर पोलीसांनी दळवी यांची आलिशान एमएच ०४ जेजे ५२५२ क्रमांकाची गाडी जप्त करुन पोलीस ठाण्या बाहेर आणुन ठेवली आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर पिडीत नगरसेविकेला भ्रमणध्वनी वरुन धमक्या आल्याने त्याचा सुध्दा गुन्हा मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. शासना कडुन सदर गुन्ह्याचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुनहे शाखेचे उपायुक्त यांच्या कडे देण्याचे जाहिर केले असले तरी अजुनही अधिकृत पत्र आले नसल्याने तपास ठाणे ग्रामीण पोलीसां कडेच आहे. दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी मेहतास तपासकामी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

Web Title: Thane Rural Police Surround in Suspicion; The accused is still not arrested in the Mehta case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.