पती 4 वर्षांपासून शोधत होता आपली 'सीमा', प्रियकरासोबत 'सना'ला पाहून बसला धक्का! पोलीसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:17 PM2021-06-21T23:17:53+5:302021-06-21T23:18:06+5:30
ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आहे. संबंधित महिला 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून रेल्वेने येत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी या महिलेचा बराच शोध घेतला. पण ती सापडली नाही.
ठाणे- येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील बेपत्ता झालेली एक महिला तब्बल 4 वर्षांनंतर सापडली. यानंतर, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला. कारण, ती महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली होती. (Thane woman missing from train found after 4 years)
ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आहे. संबंधित महिला 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून रेल्वेने येत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी या महिलेचा बराच शोध घेतला. पण ती सापडली नाही. यानंतर, जेव्हा 4 वर्षांनी तिचा पत्ता मिळाला आणि संपूर्ण प्रकरण तिच्या कुटुंबीयांना समजले, तेव्हा त्यांना मोठा हादराच बसला. ही महिला आपल्या प्रियकरासोबत तब्बल चार वर्षांपासून राहत असलेले तिच्या कुटुंबीयांना समजले.
असे आहे संपूर्ण प्रकरण -
सांगण्यात येते, की ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील एका कंपनीत शाहबाज शेख आणि सीमा कोष्टी सोबतच काम करत होते. अंबरनाथमध्ये राहणारी सीमा 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून म्हणजेच मनमाडवरून रेल्वेने येत असतानाच अचानकच बेपत्ता झाली. यानंतर तिच्या नातलगांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात दिली.
याचदरम्यान कल्याणमध्ये राहणारा शहबाज शेख देखील बेपत्ता झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाहबाज शेख आणि त्याच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवली. अखेर चार वर्षांनंतर पोलिसांना माहिती मिळाली, की कल्याण येथे राहणाऱ्या शाहबाज शेखच्या काकांचा मृत्यू झाला आहे आणि शाहबाज शेख अपली पत्नी सनासह कल्याणमध्ये आला आहे.
माहिती मिळताच पोलीस थेट शाहबाज शेखच्या घरी पोहोचले. यानंतर त्यांनी शाहबाजची पत्नी सनाची चौकशी केली. यावर, आपण सना नसून सिमाच आहोत, अशी कबुली तिने दिली. तिने सांगितले, की मनमाडवरून फरार झाल्यानंतर तिने शाहबाजसोबत लग्न केले आणि सीमाची सना झाली. सध्या प्रशासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.