ड्रग्स प्रकरणातील 'ते' तस्कर ईडीच्या रडारवर; पुणे पोलिसांकडून आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 08:52 PM2024-03-05T20:52:52+5:302024-03-05T20:53:11+5:30

पुणे पोलिसांना तसे पत्र पाठवण्यात आले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी असे म्हंटले आहे.

'That' smuggler in drugs case on ED's radar; Information about accused and property was sought from Pune police | ड्रग्स प्रकरणातील 'ते' तस्कर ईडीच्या रडारवर; पुणे पोलिसांकडून आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली

ड्रग्स प्रकरणातील 'ते' तस्कर ईडीच्या रडारवर; पुणे पोलिसांकडून आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली

किरण शिंदे: फेब्रुवारी महिन्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीचं रॅकेट उघडकीस आणलं होतं. पुणे शहरापासून ते दिल्लीपर्यंत छापेमारी करत कोट्यावधी रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणात एकूण ११ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  मागवली आहे. पुणे पोलिसांना तसे पत्र पाठवण्यात आले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी असे म्हंटले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी संबंधित माहिती देण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्याच्या सोमवार पेठ भागातून उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या माने (वय ४०), अजय करोसिया (३५), हैदर नूर शेख (४०), भीमाजी परशुराम साबळे (वय ४६), केमिकल इंजिनिअर युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४१), आयुब अकबरशहा मकानदार (वय ४८),  दिल्लीतून संदिप राजपाल कुमार (वय ३९), दिवेष चरणजित भुथानी (वय ३८), संदिप हनुमानसिंग यादव (३२) व देवेंद्र रामफुल यादव (वय ३२) व पश्चिम बंगालमधन सुनिल विरेंद्रनाथ बर्मन (वय ४२) अशा आकरा जणांना अटक केली. तर, मास्टर माईंड संदिप धुणे याच्यासह ६ जण फरार आहेत.

पुणे पोलिसांनी १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सोमवार पेठेत कारवाई केली आणि १७६० किलो मेफेड्रोन पकडले. या कारवाईत आतापर्यंत ११ जणांना अटक केली. गुन्ह्याचा तपास मोठा असून, त्याचे कनेक्शन राज्यासह इतर देश आणि परदेशात देखील निघाले आहेत. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती आणि गुन्हा संवेदनशील आहे.तर गुन्ह्यात हवाला मार्फत पैश्यांची देवाण-घेवाण झाल्याचे समोर आले.  

गुन्हा मोठा असल्याने तात्काळ यापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणेमधील एटीएस, एनआयए, एनसीबीकडून देखील या गुन्ह्याची माहिती घेतली होती. त्यानंतर आता ईडीने देखील गुन्ह्याची थोडक्यात माहिती मागवत यातील सर्व आरोपींबाबत माहिती व त्यांच्या मालमत्तेबाबत माहिती मागवली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपींच्या मालमत्तेबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान हैदर शेख, वैभव माने, ड्रग्जच्या कारखाना मालक भिमाजी साबळे आणि केमिकल इंजिनिअर यांची काही माहिती आली आहे. त्यात साबळे याच्या नावावर संबंधित कंपनी आणि पिंपळे सौदागर येथील घर आहे. तर भुजबळ याचे मुंबईत एक घर आहे. इतर माहिती येत असल्याचे माहिती सांगण्यात आले आहे..

Web Title: 'That' smuggler in drugs case on ED's radar; Information about accused and property was sought from Pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.