२२ वर्षीय ब्युटिशियनचे ‘ते’ व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना अन् मित्रांना पाठवले; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 10:53 AM2023-01-10T10:53:53+5:302023-01-10T10:54:09+5:30
पश्चिम बंगालमधील महिला दोन वर्षांपूर्वी ब्यूटीशियन कोर्ससाठी बंगळुरूला आली होती.
बंगळुरू : शारीरिक सुखाची मागणी नाकारल्यामुळे २२ वर्षीय ब्यूटीशियनचे खासगी फोटो आणि व्हिडीओ तिच्या मित्र आणि नातेवाइकांसोबत शेअर केल्याच्या आरोपाखाली एका ४७ वर्षीय सोनाराला शनिवारी बंगळुरू पोलिसांनी अटक केली. समर परमाईंक असे आरोपीचे नाव आहे, तो उलसूरचा रहिवासी असून मूळ पश्चिम बंगालचा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील महिला दोन वर्षांपूर्वी ब्यूटीशियन कोर्ससाठी बंगळुरूला आली होती. परमाईंक हा ब्यृूटी पार्लरचा नियमित ग्राहक होता आणि दोघांची जवळीक वाढली. अधिक पैसे कमवण्यासाठी त्याने तिला डान्सबारमध्ये काम करायला सांगितले. त्या काळात आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ मिळविले.
दरम्यान, महिला तिच्या मूळ राज्यात निघून गेली. नंतर ती लग्न करून पतीसोबत बंगळुरूला परतली. दरम्यान, परमाईंकने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करण्यास सुरुवात केली. तिने नकार दिल्यावर परमाईंकने तिचे व्हिडीओ तिच्या मित्र आणि नातेवाइकांना पाठवले. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी परमाईंकला शनिवारी अटक केली.