हत्येच्या प्रकरणातील फरार आरोपीस भोईवाडा पोलिसांनी केली अटक
By नितीन पंडित | Published: March 21, 2023 04:58 PM2023-03-21T16:58:52+5:302023-03-21T16:59:11+5:30
१३ फेब्रुवारी रोजी भिवंडी शहरा नजीकच्या कारीवली गावात घरा बाहेर उभ्या असलेल्या दोघा बहिणींकडे पाहून आरोपी दयानंद याने अश्लील हातवारे केले होते
भिवंडी :अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्यास जाब विचारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन भावाची हत्या केल्या प्रकरणी फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भोईवाडा पोलिसांना सोमवारी यश मिळाले आहे .दयानंद गंगाराम पामुला, वय ५६ वर्ष असे हत्ये प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .
१३ फेब्रुवारी रोजी भिवंडी शहरा नजीकच्या कारीवली गावात घरा बाहेर उभ्या असलेल्या दोघा बहिणींकडे पाहून आरोपी दयानंद याने अश्लील हातवारे केले होते .याचा जाब विचारण्या साठी गेलेल्या अल्पवयीन मुलीसह तिच्या आईस आरोपीने मारहाण केल्याने त्यांचा अल्पवयीन भाऊ सिध्दार्थ शिवशंकर मौर्या त्या ठिकाणी धावून गेला असता त्याची हत्या करून आरोपी दयानंद गंगाराम पामुला फरार झाला होता.
या घटनेनंतर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांच्या नेतृत्वाखाली चार पथक फरार आरोपीचा शोध घेत असता त्याच्या नातेवाईकयांची माहिती घेऊन त्याच्या तेलंगणा जिल्हा सिरसीला येथील मूळ वास्तव्याच्या ठिकाणचा पत्ता शोधून काढला.त्यांनतर पोलीस पथक आरोपीच्या मूळ गावी त्यास पकडण्यासाठी गेले असता फरार आरोपी पुन्हा भिवंडीत येऊन राहत असल्याचे तपासात समोर आले.त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक आर पी दराडे, पोहवा सुके,सोनगिरे,पोना सावंत, कवडे, पोशि पालवी,आलापुरे या पोलीस पथकाने सापळा रचून खोणी येथील एका कारखान्यात काम करत असतांना आरोपी दयानंद पामुला याच्या मुसक्या आवळल्या आहेत.आरोपीने भिवंडी मध्ये येत आपली ओळख पटू नये यासाठी डोक्या वरील केस काढून नेहमीच्या पेहरावात बदल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.