अपमानाचा बदला घेण्यासाठी रिक्षाचालकाला संपवलं; CCTV मुळं खूनाचं रहस्य उघड झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:19 AM2023-03-09T08:19:22+5:302023-03-09T08:19:29+5:30

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एका पोलिस पथकाने घटनास्थळाजवळील अनेक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज शोधले

The accused murdered a rickshaw driver to avenge the humiliation at Delhi | अपमानाचा बदला घेण्यासाठी रिक्षाचालकाला संपवलं; CCTV मुळं खूनाचं रहस्य उघड झालं

अपमानाचा बदला घेण्यासाठी रिक्षाचालकाला संपवलं; CCTV मुळं खूनाचं रहस्य उघड झालं

googlenewsNext

दिल्ली - कधी कधी माणूस रागाच्या भरात असं पाऊल उचलतो ज्याने त्याला आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागतो. दिल्लीच्या नरेला परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. ज्याठिकाणी एका व्यक्तीने अपमानाचा बदला घेण्यासाठी एका रिक्षाचालकाचा खून केला आहे. या घटनेचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान बनले परंतु एका सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांनी गुन्हेगाराला शोधून काढले. 

दिल्ली पोलिसांना पीसीआर कॉलवरून नरेला परिसरात नाल्याजवळ एक रिक्षाचालक गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याचं समजलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. जखमी रिक्षाचालकाच्या डोक्याला मार लागला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. मृत रिक्षाचालकाचे नाव सोहन लाल असून त्याच्या मृत्यूचं कारण कुणीतरी मारहाण केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते. पोलिसांनी याबाबत अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर तपासाला सुरुवात केली. सोहनलालचा खून कुणी आणि का केला या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना शोधायचे होते. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला संशयित आरोपी 
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एका पोलिस पथकाने घटनास्थळाजवळील अनेक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज शोधले. या व्यतिरिक्त खबऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली. पोलिसांच्या कठोर परिश्रमांनी एक संशयित आरोपी रडारवर आला. ज्याची ओळख ३२ वर्षीय मोनूच्या रुपात झाली. आता पोलिसांना आरोपीला पकडण्याचं आव्हान होते. पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आणि अखेर मोनूला अटक झाली. 

'या' कारणानं नाराज होता आरोपी
पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी मोनूची चौकशी केली. त्यात नाहरी गावांतील पवनकडून व्याजावर ४० हजार रुपये घेतले होते. ते परत करू शकला नाही. कर्जाची परतफेड करत नसल्याने पवनने सोहनलालचा मुलगा राजासोबत मिळून मला मारहाण केली होती. ज्यामुळे राजाचा राग आला होता असं आरोपीने म्हटलं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोनूने एक प्लॅन रचला. मोनूने राजाच्या वडिलांना जे रिक्षाचालक होते त्यांना कॉल करून नरेला परिसरातील नाल्याजवळ बोलावले. त्याठिकाणी सोहनलालवर मोनूने डोक्यात वार केले. इतकेच नाही तर ३-४ वार केल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सोहनलाल खाली पडले तेव्हा मोनूने डोक्यात वीट टाकली आणि तिथून पळ काढला. घटनास्थळावरून पोलिसांनी वीट आणि मृत व्यक्तीचा मोबाईल जप्त केला. 

Web Title: The accused murdered a rickshaw driver to avenge the humiliation at Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.