आरोपीने पोलिसावर पिस्टल रोखले! स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षकाचा आरोपीच्या पायावर गोळीबार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 12:31 PM2023-07-19T12:31:59+5:302023-07-19T12:32:15+5:30

जामखेड शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली

The accused stopped the pistol on the police! The police inspector fired at the feet of the accused for self-defense! | आरोपीने पोलिसावर पिस्टल रोखले! स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षकाचा आरोपीच्या पायावर गोळीबार! 

आरोपीने पोलिसावर पिस्टल रोखले! स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षकाचा आरोपीच्या पायावर गोळीबार! 

googlenewsNext

- अशोक निमोणकर

जामखेड  ( जि. अहमदनगर) :  जामखेड शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. 

यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलीसावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. जखमी आरोपीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. 

जामखेड पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव कोपनर यांनी फिर्याद दिली की, 19 रोजी 00/10 वा. चे सुमारास आरोपीत  प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार,  शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुने सर्व (रा. सारोळा ता. जामखेड) यांनी जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे इसम नामे अदनान जहर शेख, (रा. तपश्वररोड, जामखेड ता. जामखेड) यांचे डोक्याला पिस्टल लावून त्याच्या ताब्यातील अर्टिगा गाडीची (एमएच 12 केटी 4795) चोरी केली होती.

आम्ही आरोपीत इसम नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार, शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे यांचा शोध घेऊन आमचे सरकारी काम करीत असताना जामखेड ते खर्डा असे जाणारे रोडलगत असलेले हॉटेल साई समोरील मोकळ्या पटांगणात आरोपी नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार याने त्याचे कमरेला असलेल पिस्टल बाहेर काढुन आम्हाला जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे हातातील पिस्टल आमच्या दिशेने रोखुन, पिस्टलचे ट्रिगर दाबुन आमच्यावर गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला. 

परंतु त्याचे पिस्टलमधील गोळी फायर झाली नाह. त्याचे वेळी आमचे पथकातील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपीत नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार व त्याचे साथीदार यांना " तुझ्या हातातील पिस्टल खाली टाक, तुम्ही तिघेही सरेंडर करा" असे आवाहन करुन देखील आरोपीत यांनी त्यांचेकडील पिस्टल मधुन फायर करण्याचे उददेशाने पिस्टल पुन्हा कॉक करण्याचा प्रयत्न करुन तसेच आमचेशी झटापट व आम्हाला मारहाण केली. त्याच प्रमाणे आम्ही करीत असलेले सरकारी कामात अडथळा आणुन आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

सदर वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आमचे सर्वाचे स्वसंरक्षनार्थ आरोपी इसम नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार याचे दिशेने झाडलेली गोळी त्याचे उजवे पायाचे पंजावर लागुन तो जखमी झालेला आहे. पोलीसांनी वरील सर्व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The accused stopped the pistol on the police! The police inspector fired at the feet of the accused for self-defense!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.