भिवंडीतील सेक्स वर्कर महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस राज्याबाहेरून अटक
By नितीन पंडित | Published: November 27, 2023 03:23 PM2023-11-27T15:23:46+5:302023-11-27T15:24:45+5:30
पश्चिम बंगाल रेल्वे स्थानकातून शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असलेल्या हनुमान टेकडी या परिसरातील एका खोलीत हत्या झालेल्या सेक्स वर्कर महिलेच्या हत्येच्या गुन्ह्यात ओडिसा राज्यात पळून जात असलेल्या आरोपीस पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकातून अवघ्या ४८ तासात अटक करण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिक वय २४ रा.बालासोर ओडिसा असे अटक आरोपीचे नाव आहे.
२१ नोव्हेंबर रोजी रात्री देह व्यापार करणाऱ्या सेक्स वर्कर महिलेची खोलीतच दगडी पाटा वरवंटा डोक्यात मारून तिची हत्या केली होती.या वेळी घटनास्थळी तातडीने पोलिस पथकासह दाखल झालेले भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी त्याठिकाणी आलेल्या हत्या करणाऱ्या युवकाच्या मित्रास ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असता हत्या करणाऱ्या युवकाचा फोटो व वर्णन पोलिसांना दिले होते.
या प्रकरणी तातडीने पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख, भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार,पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील,रामदास कोलते,पोलिस हवालदार शशिकांत खडे,प्रशांत राणे,पोलिस नाईक राजेंद्र गवा,सचिन कोळी,राहुल पवार,अशोक कोदे,संतोष कदम,संजय कोळी,पोलिस शिपाई नितीन नंदिवाले,संजय भोसल, लहू गावीत,गणेश हरणे,शरद गोसावी,रजनीकांत पऱ्हाड यांची तीन पथके तपासा साठी तैनात केली होती.त्यानंतर आरोपी हा आपल्या मूळ गावी पळून गेला असल्याची माहिती मिळाली.
पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलिस शिपाई नितीन नंदीवाले,संजय भोसले यांचे पथक त्याच्या मागावर गेले असता आरोपीस आपल्या मूळगावी जाण्यासाठी पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकात रेल्वे बदली करावी लागत असल्याने आरोपी पप्पू हा गीतांजली एक्स्प्रेस मधून खरगपूर रेल्वे स्थानकात उतरताच पोलिस पथकाने त्यास ताब्यात घेतले व त्याकडे चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून भिवंडीत आणून न्यायालयात हजर केले असता १ डिसेंबर पर्यंत आरोपीस पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून ४८ तासात गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस अटक केल्याने तपास पथकाची पोलीस बक्षिसासाठी शिफारस करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे .