कथित नागा साधूने दोन वृद्धांची सोनसाखळी घेऊन केला पोबारा

By अझहर शेख | Published: August 24, 2022 03:29 PM2022-08-24T15:29:02+5:302022-08-24T15:29:42+5:30

विशेष म्हणजे राजरोसपणे सकाळी अवघ्या वीस मिनिटांच्या आत या दोन्ही घटना घडल्या तरी नाशिक शहर पोलिसांना हा साधू व त्याची मोटार अद्याप सापडलेली नाही. यामुळे नाशिक पोलिसांची सतर्कता व गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

The alleged naga sadhu took the gold chain of two old men | कथित नागा साधूने दोन वृद्धांची सोनसाखळी घेऊन केला पोबारा

कथित नागा साधूने दोन वृद्धांची सोनसाखळी घेऊन केला पोबारा

Next

नाशिक : एका पांढऱ्या कारमधून शहरात वावरत एका कथित नागा साधुमहाराजाने साथीदारांच्या मदतीने गोविंदनगर, म्हसरुळ या उपनगरांमध्ये चक्क दोन वृद्धांना ‘आशिर्वाद’चा बनाव केला. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या राजरोसपणे हिसकावून धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२४) उघडकीस आला. विशेष म्हणजे राजरोसपणे सकाळी अवघ्या वीस मिनिटांच्या आत या दोन्ही घटना घडल्या तरी नाशिक शहर पोलिसांना हा साधू व त्याची मोटार अद्याप सापडलेली नाही. यामुळे नाशिक पोलिसांची सतर्कता व गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून नागा साधु हा त्याची महिला व पुरूष साथीदारासोबत शहरात धार्मिक देवदर्शनासाठी आल्याचा बनाव रचतो. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या वृद्धांना एकटे गाठून त्यांना पंचवटी, त्र्यंबकेश्वरला जाण्याचा पत्ता विचारून सोन्याच्या साखळीत ‘रुद्राक्ष’ बसवून देत सुख:शांती व प्रगती लाभेल असा आमीष दाखवून सोनसाखळ्या घेऊन पसार झाला. या नागा साधूने पहिल्यांदा म्हसरूळच्या ओमकारनगर येथे एका आश्रमाजवळ भगीरथ रामचंद्र शेलार (६९,रा.शिवाजीनगर, दिंडोरीरोड) यांना अशाप्रकारे लुटले. त्यांच्याजवळ येऊन कार थांबवत त्यांना रोखले. 

कपाळाससह संपूर्ण अंगावर भस्म चोळलेला व गळ्यात रुद्राक्षाच्या माळा डोक्यावर केसांचा अंबाडा बांधलेला शरिरावर वस्त्राचा पत्ता नाही, अशा अवस्थेतील साधुमहाराजांना बघून शेलार यांनीही आदराने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी या कथित नागा साधूने त्यांना त्र्यंबकेश्वर, पंचवटीकडे जाण्याचा पत्ता विचारला. शंभराची नोट व रूद्राक्ष हाती देत आशिर्वाद’देण्याचा बनाव करत गळ्यातील गणपतीचे लॉकेट लावलेली १२ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून धूम ठाेकली. येथून हा साधू महाराज कार घेऊन थेट गोविंदनगरला पोहचला. तेथेही त्याने अशाचप्रकारे वृद्धाला गंडविले. याप्रकरणी म्हसरूळ व मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात नागा साधूविरुद्ध जबरी लूट व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...अन् म्हणे कल्याण होईल!
अवघ्या वीस मिनिटांतच त्याने अशाचप्रकारे दुसरे गृहस्थ उत्तम रामचंद्र परदेशी (७५,रा.स्क्वेअर अपार्टमेंट, गोविंदनगर यांनाही लुटले. या घटनेत नागा साधू व त्यासोबत असलेल्या महिलेने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत संगनमत करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीत रुद्राक्ष बसवून देतो, तुमचे कल्याण होईल, असे खोटे सांगून सोनसाखळी हाती घेत धूम ठोकली.

Web Title: The alleged naga sadhu took the gold chain of two old men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.