भक्तांचे कथेकडे तर ‘या’ महिलांचे मंगळसुत्रांकडे लक्ष; १० महिलांना अटक

By राजेश शेगोकार | Published: May 8, 2023 11:48 AM2023-05-08T11:48:53+5:302023-05-08T11:49:39+5:30

२ लाख २८ हजारांचे दागिने लंपास: नागपूर,वर्धेसह राजस्थान, MP तील १० महिला अटक

The attention of the devotees to the story and the attention of women to the Mangalsutras; 10 women arrested | भक्तांचे कथेकडे तर ‘या’ महिलांचे मंगळसुत्रांकडे लक्ष; १० महिलांना अटक

भक्तांचे कथेकडे तर ‘या’ महिलांचे मंगळसुत्रांकडे लक्ष; १० महिलांना अटक

googlenewsNext

अकाेला - अकाेला पातुर राेडवरील म्हैसपूर येथे ५ ते ११ मे दरम्यान शिव महापुराण कथा सुरू आहे. प्रख्यात पंडीत प्रदीप मिश्रा हे कथावाचक असल्याने या कार्यकमात भक्तांची विशेषत: महिलांची गर्दी होत आहे. या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत तब्बल १० महिलांनी कथेत गुंग महिलांच्या दागीण्यांवर हात साफ केला. तब्बल  २ लाख २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आल्यावर पाेलसांनी या प्रकरणात नागपुर,वर्धेसह राजस्थान, मध्यप्रदेशातील १० महिला अटक केली आहे.  

कथेच्या दरम्यान जेवणाची विश्रांती दिली जात आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा असतात. यावेळी महिला चोरटेसुद्धा गर्दीचा फायदा घेऊन भाविक महिलांचे दागिने लंपास करीत आहे. अश्विनी अमित जुनारे (२९) रा. शास्त्री नगर अकोला यांनी सोन्याचे १ लाख २० हजारांचे दागिने लंपास झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. तसेच अर्चना दिगांबर देशमुख रा. नांदुरा, जि. बुलडाणा यांनी १८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दाखल केली. मानसी अमित मुरारका रा. न्यु राधाकिसन प्लाॅट अकोला यांनीही पोलिसांत तक्रार दिली. त्यांची ९० हजारांची पोत व अन्य सोन्याचे दागिने लंपास झाल्याची फिर्याद दिली. तिघांचे एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १० महिलांना ताब्यात घेऊन अटक केली.

यांना केली अटक 
आशा हरीलाल धोबी (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), मुंज्जु देवी राजु धोबीरा (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), चंदा सोनु धोबी (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), अनिता सुरेश धोबी (रा रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), कमलेश सुरजलाल बावरीया (रा. रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), शशी रीकु बावरीया (रा.रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), कश्मीरा हीरालाल बावरीया (रा.रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), प्रीया संदीप उन्हाळे (रा सावंगी मेघे जि वर्धा), सुरया राप्रसाद लोंडे (रा सावंगी मेघे जि वर्धा), लता किशन सापते (रा. भीमनगर इदोर राज्य मध्यप्रदेश) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.

Web Title: The attention of the devotees to the story and the attention of women to the Mangalsutras; 10 women arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.