Udaipur killing: २६११ नंबर असलेली बाईक कन्हैयाच्या मारेकऱ्याने 5000 खर्चून घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 05:48 PM2022-07-01T17:48:17+5:302022-07-01T17:49:06+5:30
Udaipur killing: योगायोगाने हा एकदा मुंबईवर झालेल्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तारखेशी मिळता जुळता आहे.
उदयपूरमधील टेलर कन्हैया लालच्या भीषण हत्येच्या तपासावर एनआयएची टीम कंबर कसत आहे. या घटनेशी संबंधित प्रत्येक कान्याकोपऱ्यातून तपास करण्यासाठी 6 आयजी दर्जाचे अधिकारी उदयपूरला पोहोचले आहेत. या घटनेत आणखी काही लोक किंवा दहशतवादी संघटनांचा हात असण्याची शक्यता एनआयएने वर्तवली आहे. यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आरोपी रियाज आणि गौस मोहम्मद ज्या दुचाकीवरून पळून जात होते, त्याचा क्रमांक 2611 आहे. योगायोगाने हा एकदा मुंबईवर झालेल्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तारखेशी मिळता जुळता आहे. या विशेष क्रमांकासाठी आरोपींनी आरटीओमध्ये 5000 रुपयांचा ड्राफ्ट सादर केला होता. आता तपास यंत्रणा या दुचाकी क्रमांकाबाबत तपास करत आहेत.
दोन्ही आरोपी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते
ज्या निर्दयतेने मारेकऱ्यांनी कन्हैया लालची हत्या केली, ती घटना सामान्य गुन्हेगारी घटना नसून दहशतवादी घटना होती. तपास यंत्रणांच्या मते, त्याचा कट पाकिस्तानमध्ये लिहिला गेला होता. नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यापासून हे दोन्ही मारेकरी पाकिस्तानात बसलेल्या लोकांच्या संपर्कात होते. दोघेही पाकिस्तानच्या 8 ते 10 मोबाईल नंबरवर सतत बोलत होते.
दहशत पसरवण्याच्या सूचना मारेकऱ्यांना पाकिस्तानकडून मिळत होत्या. कन्हैया लाल यांच्यानंतर हे दोन्ही मारेकरी उदयपूरमधील आणखी एका व्यावसायिकाची हत्या करणार होते. कन्हैय्या लालच्या मारेकऱ्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ आणि घौस हे आरोपी दहशतवादी आयएसआयएसशी संबंधित होते.
रियाझ अत्तारी हा अलसुफाचा प्रमुख आहे
रियाझ अत्तारी हा उदयपूरमधील ISIS च्या अलसूफा या रिमोट स्लीपर संघटनेचा प्रमुख आहे. मोबाइल, इंटरनेट कॉलिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रियाझ थेट आयएसआयएसच्या संपर्कात होता. रियाझ गेल्या पाच वर्षांपासून उदयपूर मोहम्मद घौसच्या सहकार्याने दहशतवादी मोहीम गुप्तपणे चालवत होता. दोन्ही दहशतवाद्यांनी उदयपूरच्या आसपासच्या तरुणांचे ब्रेनवॉश करण्यासाठी अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले होते.
12 जून रोजी रियाझने खोली भाड्याने घेतली होती.
आज तकची टीम मारेकरी रियाझच्या लपण्याच्या ठिकाणीही पोहोचली, जिथून पोलिसांना कन्हैया लालच्या हत्येतील दहशतवादी कटाशी संबंधित पुरावे मिळाले आहेत. रियाझने १२ जून रोजी खोली भाड्याने घेतली होती. राजस्थान पोलिसांनी टाळे ठोकले आहे. येथे हे कुलूप तोडण्यात आले आहे. पोलिसांनी येऊन तपास केला. बरेच काही जप्त केले आहे.