घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 06:31 PM2024-05-28T18:31:17+5:302024-05-28T18:32:02+5:30

या तिन्ही मुलांच्या अचानक जाण्यानं घरचे टेन्शनमध्ये होते. त्या तिघी मैत्रिणी होत्या, त्यातील एका मुलीने घरात चिठ्ठी लिहिली होती.

The bodies of 3 girls who ran away from Muzaffarpur are likely to be found in Mathura | घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...

घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...

मुझफ्फरपूर - बिहारच्या मुझफ्फरपूर इथं राहणाऱ्या ३ मुली १५ दिवसांपूर्वी घरातून पळाल्या. या तिघीही मैत्रिणी होत्या. त्यातील एका मुलीनं घर सोडताना एक चिठ्ठी लिहिली. त्यात असं काही लिहिलं होतं, ज्यानं कुणीही या तिघींना शोधण्याची हिंमत केली नाही. त्यातच मथुरा इथं ३ मुलींचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या मृतदेहांचे मुझफ्फरपूर कनेक्शन आहे का याचा तपास सुरू झाला आहे.

मुझफ्फरपूर येथील योगिया मठापासून अचानक ३ मुली गायब झाल्या. त्यांचं नाव माया, गौरी आणि माही होतं. मथुरा येथील रेल्वे ट्रॅकवर जे ३ मृतदेह सापडले आहेत ते मुझफ्फरपूर येथून पळालेल्या त्याच मुलींचे असल्याचं बोललं जातं. मात्र यावर अधिकृत माहिती आली नाही. या मृतदेहांच्या DNA चाचणीनंतरच स्पष्ट होईल असं पोलीस सांगतायेत. काही दिवसांपूर्वी ३ मुली अचानक बेपत्ता झाल्याने मुझफ्फरपूर येथे खळबळ माजली होती. 

या तिन्ही मुलांच्या अचानक जाण्यानं घरचे टेन्शनमध्ये होते. त्या तिघी मैत्रिणी होत्या, त्यातील एका मुलीने घरात चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की, आम्ही तिघी हिमालय अथवा लालगंज येथे जातोय. आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आम्ही विष पिऊ. जर कुणी शोधण्याचा प्रयत्न केला तर विष पिऊन आम्ही आत्महत्या करू असं लिहिल्याने घरच्यांना धक्का बसला. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. त्यात या मुलींचे शेवटचे लोकेशन उत्तर प्रदेशात असल्याचं आढळलं. 

दरम्यान, या मुली बेपत्ता झाल्यानंतर मथुरा येथे रेल्वे ट्रॅकवर मुलींचे मृतदेह सापडले. या तिन्ही मुलींच्या हातावर मेहंदी होती. एका युवतीच्या हातावर SBG असं लिहिलं होतं. त्याचसोबत पोलिसांना मृतदेहाच्या कपड्यांमध्ये ग्लोब टेलर मुझफ्फरपूर असं लिहिलेलं स्टिकरही सापडले. त्यामुळे मुझफ्फरपूर येथून पळालेल्या या तिन्ही मुलींचेच हे मृतदेह असल्याचा संशय पोलिसांना आहे. परंतु डिएनए चाचणीशिवाय याची अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. 

Web Title: The bodies of 3 girls who ran away from Muzaffarpur are likely to be found in Mathura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.