बंद खोलीत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, ट्यूशन शिक्षिकाने बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 07:08 PM2022-02-14T19:08:51+5:302022-02-14T19:10:07+5:30
Rape And Murder Case : रविवारी मेडिकल बोर्डाकडून मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून आज सकाळी तिचा मृतदेह पोलिसांनी अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.
कोटा : नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांचे हात अजूनही रिकामेच आहेत. अशा स्थितीत या प्रकरणाच्या तपासासाठी १२ हून अधिक पथके तयार करून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. रविवारी मेडिकल बोर्डाकडून मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून आज सकाळी तिचा मृतदेह पोलिसांनी अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.
मात्र, आरोपी ट्युशन शिक्षकाला अटक न केल्याने आज अनेक बाजारपेठा बंद ठेवून निषेध व्यक्त केला. त्याचवेळी रामपुरा कोतवालीच्या बाहेर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापारी महासंघ रात्रीपासून धरणे धरून बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने रामपुरा कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिची हत्या केली. मात्र, पोलीस याला दुजोरा देत नाहीत. आरोपी शिक्षकाला अटक न केल्याने संतप्त झालेल्या शहरातील अनेक व्यावसायिकांनी आज आपली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज शहरातील अनेक बाजारपेठा बंद राहणार आहेत. या व्यावसायिक आणि कामगार संघटनेची मागणी आहे की मारेकरी शिकवणी शिक्षक गौरव जैनला तात्काळ अटक करण्यात यावी, ज्याने मुलीवर निर्दयीपणे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि अयशस्वी होऊन तिची हत्या केली.
कोटा शहराचे एसपी केसर सिंह शेखावत या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी डझनहून अधिक टीम तयार केल्या आहेत, जे आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोपीच्या पलायनाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये तो उत्तरी बायपासवरील कोटा शहरातील नयापुरा, रंगपूर आणि भडाना या भागात गेला आहे. मात्र, आता या संदर्भात पोलीस तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
माझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे, तिला माझ्या स्वाधीन कर नाहीतर ॲसिड फेकेन... माथेफिरू प्रियकराची करतूद
खासदार राजेंद्र गावित यांना कोर्टाचा दणका, कोर्टाने सुनावली शिक्षा अन् रक्कम भरण्याचे दिले आदेश
वैद्यकीय अहवालानुसार अल्पवयीन मुलीच्या पोटावर आणि बोटांवर जखमा आहेत. यासोबतच मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने केली नाही. अशा स्थितीत पोलिसांनी बारकाईने तपास करून या प्रकरणात दोषी कोण आहे, त्याचीही चौकशी झाली पाहिजे.