बेपत्ता मुलाचा तुकड्यांमध्ये धान्याच्या पेटीत आढळला मृतदेह, परिसरात तणावपूर्ण वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 07:48 PM2022-03-13T19:48:51+5:302022-03-13T19:49:17+5:30

Deadbody Found : ९ वर्षांचा मुलगा कन्हैया हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका लॉजजवळ खेळत होता. खेळल्यानंतर मुलगा घरी परतला नाही. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाच्या हरवल्याची तक्रार नोंदवून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले.

The body of a missing child was found in a grain box in pieces, a tense atmosphere in the area | बेपत्ता मुलाचा तुकड्यांमध्ये धान्याच्या पेटीत आढळला मृतदेह, परिसरात तणावपूर्ण वातावरण

बेपत्ता मुलाचा तुकड्यांमध्ये धान्याच्या पेटीत आढळला मृतदेह, परिसरात तणावपूर्ण वातावरण

googlenewsNext

उत्तर प्रदेश - चित्रकूटमध्ये चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडल्याने उत्तर प्रदेशातील खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संतापलेल्या लोकांनी चित्रकूटच्या रत्नावली मार्ग आणि कापसेठी येथे ठिकठिकाणी वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बळजबरीने नेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला आणि दगडफेक सुरू केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांना लाठीमार करावा लागला. राघवपुरी, कारवी कोतवाली येथील रहिवासी रामप्रयाग उर्फ ​​पराग वर्मा यांनी ८ मार्च रोजी आपल्या मुलाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

९ वर्षांचा मुलगा कन्हैया हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका लॉजजवळ खेळत होता. खेळल्यानंतर मुलगा घरी परतला नाही. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाच्या हरवल्याची तक्रार नोंदवून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. मुलाच्या आजोबांनी  सांगितले, शनिवारी शेजाऱ्यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला. घराची झडती घेतली असता अन्नधान्याच्या पेटीत मुलाचा मृतदेह आढळून आला. तुकड्यांमध्ये आढळलेल्या मुलाचा मृतदेह पाहून परिसरात खळबळ उडाली. त्याचवेळी या प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. 

Web Title: The body of a missing child was found in a grain box in pieces, a tense atmosphere in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.