हॉटेलमध्ये तरुणीचा रक्तबंबाळ अवस्थेत सापडला मृतदेह; बहिणींना प्रियकरावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 01:34 PM2022-02-28T13:34:31+5:302022-02-28T13:35:10+5:30

Murder Case : शिवम नावाच्या त्याच्या एका मित्राने ही हत्या करून तेथून त्याने पळ काढल्याचा आरोप आहे.

The body of a young girl was found in a bloody situation in a hotel; Sisters doubt on boyfriend | हॉटेलमध्ये तरुणीचा रक्तबंबाळ अवस्थेत सापडला मृतदेह; बहिणींना प्रियकरावर संशय

हॉटेलमध्ये तरुणीचा रक्तबंबाळ अवस्थेत सापडला मृतदेह; बहिणींना प्रियकरावर संशय

Next

राजधानी दिल्लीच्या दक्षिण पश्चिम भागात हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. महिपालपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. रिपोर्टनुसार, मुलीचे नाव सोनिया (नाव बदलले आहे) असल्याचे सांगण्यात येत आहे.


27 फेब्रुवारी रोजी व्हीके दक्षिण पोलिसांना महिपालपूर येथील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हॉटेलच्या खोलीत घुसून सोनियाची हत्या करण्यात आली आहे. शिवम नावाच्या त्याच्या एका मित्राने ही हत्या करून तेथून त्याने पळ काढल्याचा आरोप आहे.

हत्येची माहिती मिळताच डीसीपी दक्षिण पश्चिम घटनास्थळी पोहोचले. सोनिया (नाव बदलले आहे) असे मृत महिलेचे नाव आहे.
गाझियाबादचा रहिवासी शिवम चौहान आणि तरुणी गेल्या चार वर्षांपासून मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे. शिवमने 25 फेब्रुवारीला ती खोली बुक केली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघेही लग्न करणार होते. त्यामुळे घरच्यांना सांगून ती अनेकदा प्रियकरासह १ ते २ दिवस घराबाहेर पडली. मृताच्या बहिणींचे म्हणणे आहे की, मृत तरुणी नेहमी तिच्या प्रियकरासोबत लग्नाबाबत बोलायची आणि शिवम हे टाळत असे.

हॉटेलमध्ये झडती घेत असताना पोलिसांना दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. गुन्हे शाखेच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सफदरजंग रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असून पथके आरोपीला शोधण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

Web Title: The body of a young girl was found in a bloody situation in a hotel; Sisters doubt on boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.