वाईटरित्या कुजलेला होता मृतदेह, खुर्चीवर २ वर्ष मृतावस्थेत पडून होती महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:52 PM2022-02-10T19:52:28+5:302022-02-10T21:20:49+5:30
Women Deadbody Found : येथे एका ७० वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी तिच्या घरात सापडला होता.
रोम : पाश्चिमात्य देशांमध्ये एकटेपणा ही शोकांतिकेपेक्षा कमी गोष्ट नाही. लोकांनी स्वतःला इतक्या ठराविक मर्यादेत ठेवले आहे की त्यांना आजूबाजूला काय चालले आहे याची कल्पना सुद्धा नसते. शेजारी कोणी मेले तरी कळत नाही. असेच एक प्रकरण इटलीमध्ये समोर आले आहे. येथे एका ७० वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी तिच्या घरात सापडला होता.
खरं तर, ती महिला एकटीच राहत होती, त्यामुळे तिचा मृत्यू केव्हा झाला हे कोणालाही कळले नाही. झाड पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी महिलेच्या घरी पोहोचले असता तिचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.
बापरे! ५ कोटींच्या कारसाठी आकारला दंड, मालकाचे उत्तर ऐकून पोलीसही झाले अवाक्...
भेटायला ये नाहीतर जीव देईन, मैत्रिणीला दिली धमकी; भेटल्यावर केलं भयानक कृत्य
वाईटरित्या कुजलेला मृतदेह
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, मारिनेला बेरेटा नावाची महिला उत्तर इटलीतील लोम्बार्डी येथील लेक कोमोजवळ राहात होती. कोमो सिटी हॉलचे प्रेस अधिकारी फ्रान्सिस्का मॅनफ्रेडी यांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह कुजलेला होता. ती खुर्चीवर बसली होती आणि बसलेलं असताना तिचा जीव गेला असावा. शुक्रवारी झाड पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी मरिनेला बेरेटाचा मृतदेह बाहेर काढला.
मॅनफ्रेडी म्हणाले की, महिलेच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. मृतदेहाच्या तपासणीनंतर, 2019 च्या अखेरीस मरिनेला बेरेटाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. बेरेटाचे कोणतेही कुटुंब किंवा नातेवाईक अद्याप पुढे आलेले नाहीत. मृताचे कोणी कुटुंब आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या बेरेटाचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला आहे. त्याचे कुटुंबीय किंवा नातेवाईक सापडले नाहीत, तर प्रशासनाकडून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
एकटेपणाचा बळी ठरला
कोमोचे महापौर मारियो लँडरिसिना यांनी सांगितले की, जर मरिनेला बेरेटाचे कुटुंब नसेल तर संपूर्ण शहर कुटुंब म्हणून तिचे अंतिम संस्कार करेल. यावेळी सर्व शहरवासीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन मी करतो. स्थानिक समाजसेवेच्या मदतीची गरज असलेल्या लोकांच्या यादीतही बेरेटा यांचे नाव नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत कोणालाच काही कळू शकले नाही. त्याच वेळी, इटलीच्या कौटुंबिक आणि समान संधी मंत्री, एलेना बोनेट्टी यांनी बेरेटाच्या मृत्यूबद्दल दु: ख व्यक्त केले आणि म्हटले की, ती एकाकीपणाची बळी ठरली आहे. आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, हीच कुटुंबाची भावना असल्याचे ते म्हणाले. कोणीही एकटे राहू नये ही आपली जबाबदारी आहे.