जोरदार धडकेनंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह उडाला कारवर, महिला कार चालवतच राहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 09:24 PM2022-07-01T21:24:12+5:302022-07-01T21:24:34+5:30

Accident : या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून तो हृदय हेलावणारा आहे.

The body was found on the vehicle after a heavy collision, the woman continued to drive the car | जोरदार धडकेनंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह उडाला कारवर, महिला कार चालवतच राहिली

जोरदार धडकेनंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह उडाला कारवर, महिला कार चालवतच राहिली

Next

एका 67 वर्षीय महिला कार चालकाने एका 26 वर्षीय दुचाकीस्वाराला एका चौकात कारने धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार कारवर आला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, महिला चालक दुचाकीस्वाराच्या गाडीच्या छतावर असलेल्या मृतदेहासह गाडी चालवत राहिली. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून तो हृदय हेलावणारा आहे.


हे प्रकरण मलेशियातील क्वाला सेलंगोर शहरातील आहे. जिथे 23 जून रोजी हा अपघात झाला होता. या भीषण अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ज्येष्ठ नागरिक महिलेने धडक दिल्यानंतर सुमारे 2 किलोमीटर कार चालवत राहिली. यादरम्यान दुचाकीस्वाराचा मृतदेह त्याच्या कारच्या वर छतावर होता. यानंतर तेथून जाणाऱ्या लोकांनी तिला अडवून अपघाताची माहिती दिली.

यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला
त्याचवेळी याप्रकरणी पोलिस प्रवक्त्याचे वक्तव्यही आले आहे. त्या महिलेला चौकात कार थांबवता आली नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. क्वाला सेलंगोरचे पोलीस प्रमुख रामली कासा यांनी सांगितले की, टक्कर जोरदार होती, त्यामुळे दुचाकीस्वार धडकल्यानंतर कारच्या छतावर पोहोचला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबातील सदस्य महिलेसोबत होते
ही घटना घडली तेव्हा महिला तिचा भाऊ आणि मित्रांसोबत होती. त्याचवेळी दुचाकीस्वाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दुचाकीस्वाराला धडक देणाऱ्या वृद्ध महिलेला अनेक आजारांनी ग्रासले आहे. यामध्ये मधुमेह, किडनी समस्या, उच्च रक्तदाब यांचा समावेश आहे. या अपघाताचा तपास सुरू आहे.

 

Web Title: The body was found on the vehicle after a heavy collision, the woman continued to drive the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.