मुलाला बारमध्ये एंट्री मिळाली नाही, तर रागाच्या भरात तोडले हॉटेलचे गेटच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 02:51 PM2022-04-05T14:51:19+5:302022-04-05T14:51:56+5:30
Five star hotel beer bar entry rules hotel gate over a quarrel in chennai : त्यानंतर रागाच्या भरात कारमध्ये बसून हॉटेलच्या गेटवर कार धडकवली. या धडकेने मुलाच्या कारचे नुकसान झाले.
तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये एका 19 वर्षीय मुलाने रागाच्या भरात आपली कार पंचतारांकित हॉटेलच्या गेटवर धडकवली. वास्तविक, कमी वय असल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला बारमध्ये प्रवेश दिला नाही. या प्रकरणाबाबत या मुलाने आधी हॉटेल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले आणि नंतर शिवीगाळ केली.
त्यानंतर रागाच्या भरात कारमध्ये बसून हॉटेलच्या गेटवर कार धडकवली. या धडकेने मुलाच्या कारचे नुकसान झाले. कारचा पुढील भाग पूर्णपणे तुटला. हॉटेलच्या गेटचेही नुकसान झाले. त्यात मुलगाही जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेत मुलाला रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
पारंगीमलाई पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मुलाच्या गाडीत तामिळनाडू पोलिसांचे स्टिकर असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, हा मुलगा बारमध्ये दारू पिण्याचा हट्ट करत होता, पण वय कमी असल्याने त्याला बारमध्ये प्रवेश दिला गेला नाही. त्यानंतर अचानक तो त्याच्या कारमधून आला आणि त्याने कार हॉटेलच्या गेटवर धडकवली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.