मुलांनी घराबाहेर काढलं, मुलीनेही नाकारलं; वृद्ध बापाची व्यथा ऐकून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:37 PM2022-09-30T12:37:05+5:302022-09-30T12:37:38+5:30

२ कमवती मुले आणि ४ मुली असूनही बापाला दारोदारी भटकत राहावं लागलं. मुलांनी घरातून बाहेर काढलं

The boys kicked out the house, the girl also refused; Old father Refuses To Compromise With Sons | मुलांनी घराबाहेर काढलं, मुलीनेही नाकारलं; वृद्ध बापाची व्यथा ऐकून डोळे पाणावतील

मुलांनी घराबाहेर काढलं, मुलीनेही नाकारलं; वृद्ध बापाची व्यथा ऐकून डोळे पाणावतील

googlenewsNext

लखनौ - मागील ३ दिवसांपासून वृद्ध वडिलांना घरात घेण्यासाठी २ मुलांचं समुपदेशन सुरू आहे परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मुलांच्या करतुतीमुळे वैतागलेल्या बापाने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी वृद्धाच्या तक्रारीवरून मुलगा विजय आणि बृजेश यांच्यावर मारहाण आणि छळवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वृद्धाश्रमात डोक्यावर छत आणि खायला दोनवेळचं इज्जतीचं जेवण मिळेल. आयुष्याचे ४ दिवस राहिले ते इथेच काढेन. पण मुलांसोबत जाणार नाही अशी भूमिका बापानं घेतली. 

या वृद्ध बापाने पोटच्या मुलांवर आरोप केला आहे की, त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा छळ केला. मोठ्या मुलाने तर मारलं आहे. घरातून अपमानास्पद वागणूक देत बाहेर काढलं. आजारपणात एका हातात युरिन बॅग घेऊन वृद्ध रस्त्यावर पडला होता. तेव्हा वन स्टॉप सेंटरच्या टीमच्या मदतीने या वृद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ज्यांची मुले आहेत त्यांना म्हातारपणी कसली चिंता असं म्हटलं जातं. परंतु ८५ वर्षीय रामेश्वर प्रसाद यांची व्यथा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील. 

२ कमवती मुले आणि ४ मुली असूनही बापाला दारोदारी भटकत राहावं लागलं. मुलांनी घरातून बाहेर काढलं तर मुलीने स्पष्ट शब्दात म्हटलं. मुले आहेत त्यांच्याकडे जा, आमच्याकडे ठेऊ शकत नाही. हातात युरिन बॅग घेत रस्त्यावर पडलेल्या रामेश्वर प्रसाद यांना एका सामाजिक संस्थेने पाहिले. मागील सोमवारी त्यांना सरोजनीनगरच्या वृद्धाश्रमात ठेवण्यात आले. या सेंटरच्या एका कार्यक्रमावेळी रामेश्वर प्रसाद यांनी पत्र लिहून स्वत:ची व्यथा मांडली. 

काय म्हणाले रामेश्वर प्रसाद?
जुन्या टिकेतगंज येथे घर होते. मसाल्याचं काम करत होता. वाढत्या वयामुळे काम बंद झाले. ४ मुली होत्या त्यांचे लग्न झाले आहे. मुले वाहन चालक म्हणून काम करतात. याच मुलांनी मला बाहेर काढलं. तब्येत बिघडल्यानंतर मी बलरामपूर हॉस्पिटलमध्ये जात दाखल झालो. तिथून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुलीच्या घरी गेलो तिने तिच्या घरात ठेवण्यास नकार दिला. कमाई बंद झाल्यानंतर मी ओझं बनून जगतोय. मोठ्या मुलाने दोनदा मला मारहाण केली. आता कामही करू शकत नाही. जेवणाची आणि औषधाची चणचण जाणवते असं त्यांनी म्हटलं. 

Senior Citizen Act काय आहे?
वृद्ध आई-वडील यांचा छळ करण्याचा गुन्हा सिनिअर सीटीजन एक्ट अंतर्गत येतो. २०१९ मध्ये या कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर सावत्र मुले, दत्तक मुले आणि सून यांनाही कायद्यांतर्गत आणले. यात १० हजार प्रति महिना किंवा त्याहून अधिक भरपाई करण्याचे आदेश कोर्ट देऊ शकतं. त्याचसोबत ३ महिने जेल, १० हजार दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. कायद्यानुसार, सासू-सासरे, आजी आजोबा यांचा छळ करणेही कायद्याने गुन्हा आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: The boys kicked out the house, the girl also refused; Old father Refuses To Compromise With Sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.