लग्नपत्रिकेवर नवरीच्या भावानं 'असं' काही छापलं; पोलीस संतापले, युवकाला झाली जेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:49 PM2023-02-17T17:49:06+5:302023-02-17T17:49:29+5:30

आकाशच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका शहरात सगळीकडे वाटून झाली होती. आकाशने परिसरातील  एसपी राकेश कुमार सिंग यांनाही लग्नाला बोलावले होते.

The bride's brother printed his post as private secretary of CM on the marriage invitation; The police got angry, the youth was jailed | लग्नपत्रिकेवर नवरीच्या भावानं 'असं' काही छापलं; पोलीस संतापले, युवकाला झाली जेल

लग्नपत्रिकेवर नवरीच्या भावानं 'असं' काही छापलं; पोलीस संतापले, युवकाला झाली जेल

Next

मध्य प्रदेशातील दमोह येथून एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी नवरीच्या भावाने लग्नपत्रिकेत अशी एक गोष्ट छापली की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि त्याला तुरुंगात जावे लागले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा स्वीय सचिव असल्याचे सांगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तुरुंगात टाकले त्यानंतर कुटुंबाला धक्का बसला. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा खाजगी सचिव दमोहशी संबंधित आहेत. दमोहच्या सिव्हिल वॉर्ड क्रमांक तीनमध्ये राहणाऱ्या आकाश दुबे नावाच्या व्यक्तीच्या बहिणीचे लग्न होते, या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर आकाश दुबे याने त्याच्या नावापुढे खासगी सचिव, माननीय मुख्यमंत्री, मध्य प्रदेश सरकार असा पद लिहिले होते. 

लग्नपत्रिकेमुळे उडाला गोंधळ
आकाशच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका शहरात सगळीकडे वाटून झाली होती. आकाशने परिसरातील  एसपी राकेश कुमार सिंग यांनाही लग्नाला बोलावले होते. ही गोष्ट एसपींच्या पचनी पडली नाही आणि त्यांनी भोपाळ स्तरावर चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की मुख्यमंत्र्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये अशा नावाचा कुणीच नाही. त्यानंतर स्वत: दमोहच्या एसपींनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून कोतवाली पोलिसांना तपासाचे आदेश दिले, त्यानंतर आकाश दुबे या पदाचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट झाले, या युवकाला ताब्यात घेऊन फसवणूक आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आकाशला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

रात्री उशिरा मीडियाला माहिती देताना एसपी राकेश कुमार सिंह म्हणाले की, असे कृत्य गुन्हेगारी श्रेणीत येते, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश अनेक दिवसांपासून या पदाचा हवाला देऊन परिसरातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मूर्ख बनवत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दमोह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 

Web Title: The bride's brother printed his post as private secretary of CM on the marriage invitation; The police got angry, the youth was jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.