कॅब चालकाने पॅसेंजरची केली हत्या, OTP सांगण्यास विलंब झाल्याच्या रागातून घडली घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 04:57 PM2022-07-05T16:57:56+5:302022-07-05T16:58:42+5:30

Murder Case : चिडलेल्या चालकाचा त्याच्या प्रवाशाशी वाद झाला. ड्रायव्हरने ओटीपी शेअर न केल्यास वाहनातून खाली उतरण्यास सांगितले.

The cab driver killed the passenger, the incident took place out of anger over the delay in telling the OTP | कॅब चालकाने पॅसेंजरची केली हत्या, OTP सांगण्यास विलंब झाल्याच्या रागातून घडली घटना 

कॅब चालकाने पॅसेंजरची केली हत्या, OTP सांगण्यास विलंब झाल्याच्या रागातून घडली घटना 

Next

केलंबक्कम पोलिसांनी सोमवारी कॅब ड्रायव्हरला एका प्रवाशाला वन टाईम पासवर्ड (OTP)  देण्यावरून झालेल्या जोरदार वादानंतर प्रवाशाला मृत्यूच्या दारात ढकलल्याबद्दल अटक केली. अटक आरोपीचे नाव रवी (४१) आहे. 

मृत उमेंदर हा कोईम्बतूर येथील एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता आणि आठवड्याच्या शेवटी तो शहरात आला होता. तो आणि त्याचे कुटुंब गुडुवनचेरी येथे एका नातेवाईकाच्या घरी राहिले. रविवारी ते पत्नी भव्या आणि बहिणीच्या कुटुंबासोबत नवलूर येथील राजीव गांधी सलाई येथील मॉलमध्ये गेले होते. ते गुडुवनचेरी येथे परतत असताना त्यांच्या नातेवाईकाचे कुटुंब राहत असताना, उमेंदरने परत येताना कॅब बुक केली. ठरलेल्या वेळेनुसार कॅबही पोहोचली. मात्र, कॅब चालकाला ओटीपी सांगण्यापूर्वीच मुलं गाडीत जाऊन बसली. यामुळे चालकाचा राग आला आणि सात लोकांच्या कुटुंबासाठी मोठे वाहन बुक करावे लागेल असे चालकाने सांगितले. नंतर त्याने व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. चेहऱ्यावर मारहाण केल्याने व्यक्तीच्या नाकातून रक्त निघाले. नंतर फोन डोक्यावर मारला. रुग्णालयात नेत असताना व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे. एच. उमेंदर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, कार उमेंदरपर्यंत पोहोचताच सोबत असलेली मुलं त्यात चढली. ड्रायव्हर रवीने त्याला वन टाइम पासवर्ड शेअर करण्यास सांगितल्याने उमेंदर त्याचा मोबाईल शोधत होता. नंबर शेअर करण्यात थोडा विलंब झाला. यामुळे चिडलेल्या चालकाचा त्याच्या प्रवाशाशी वाद झाला. ड्रायव्हरने ओटीपी शेअर न केल्यास वाहनातून खाली उतरण्यास सांगितले.

 
मोठा आवाज करत दार बंद करून उमेंदर गाडीतून खाली उतरला. चालकाने त्याला आणखी शिवीगाळ केली. यावेळी उमेंदरने ड्रायव्हरला कोल्ड  ड्रिंकच्या कॅनने मारले. त्यानंतर रवीने कारमधून खाली उतरून उमेंदरला मोबाईलने मारले आणि त्याच्या तोंडावर ठोसा मारला. त्यालाही खाली ढकलले आणि कुटुंबीयांनी चालकाला बेदम मारहाण केली. दरम्यान, उमेंदर बेशुद्ध पडला आणि त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Web Title: The cab driver killed the passenger, the incident took place out of anger over the delay in telling the OTP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.