भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाची चेन हिसकाविली

By देवेंद्र पाठक | Published: October 3, 2022 10:20 PM2022-10-03T22:20:12+5:302022-10-03T22:20:55+5:30

धुळे तालुक्यातील मोराणे शिवारातील घटना, दोघांवर गुन्हा

The chain of the young man who came to settle the quarrel was snatched | भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाची चेन हिसकाविली

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाची चेन हिसकाविली

Next

धुळे : भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून दोघांनी पोबारा केला. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील माेराणे प्र. ल. शिवारात घडली. धुळे तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.

धुळे तालुक्यातील मोराणे प्र. ल. फाट्यावरील हॉटेल तन्वीजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मित्रांचे भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्यासाठी रवी सुरेशकुमार मोटवाणी (३२, रा. कुमारनगर, धुळे) हा आला. विकोपाला जात असलेले भांडण सोडविण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याचा राग दोघांना आला. यातून रवी माेटवाणी याला शिवीगाळ करीत कानशिलात लगाविण्यात आली. एवढेच नाहीतर गळ्यातील दीड तोळे वजनाची ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकाविली. यानंतर दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. स्वत:ला सावरत रवी मोटवाणी याने धुळे तालुका पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सोमवारी पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास योगेश बेडसे (पूर्ण नाव माहिती नाही) आणि भैय्या (पूर्ण नाव माहिती नाही) (दोन्ही रा. साक्री रोड, धुळे) यांच्या विरोधात भादंवि कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजेश्री पाटील करीत आहेत.

Web Title: The chain of the young man who came to settle the quarrel was snatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.