बापरे! मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, झाला स्फोट, चारजण झाले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 01:39 PM2022-02-24T13:39:41+5:302022-02-24T13:40:53+5:30
Bomb blast : शेतात स्फोट झाल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले आणि त्यांनी सर्व जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील मैदानात खेळणाऱ्या मुलांनी बॉल समजून बॉम्ब उचलला. मुलांनी बॉम्ब उचलताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात चार मुले जखमी झाली.
शेतात स्फोट झाल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले आणि त्यांनी सर्व जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नजमा, रुजिया आणि रहीमा, आथिया अशी जखमींची नावे आहेत.
घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, गावातील मोनीर शेख नावाच्या व्यक्तीच्या घराच्या मागे हा स्फोट झाला. दुपारी काही मुले तिथे खेळत होती. त्यानंतर एका मुलाने तो बॉम्ब बॉल म्हणून उचलला आणि बॉम्बचा स्फोट झाला. त्याचवेळी असा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा भावाला आला राग, प्रियकराला फसवून बोलावले अन् ...
पश्चिम बंगालमधून अनेकदा अशा स्फोटांच्या बातम्या येत असतात. आसनसोलमध्ये दरोडेखोरांकडून बॉम्ब जप्त आसनसोलच्या राणीगंजच्या रामबागनमध्ये रविवारी रात्री दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये झालेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी आणि एक दरोडेखोर जखमी झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दारूगोळ्यासह आधुनिक सॉकेट बॉम्बही जप्त करण्यात आला आहे. राणीगंजमधील एका निर्जन ठिकाणी नंतर बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला.