गुजरात येथून चोरीला गेलेल्या मोबाईल चोरी प्रकरणाचे कनेक्शन गोव्यातही
By सूरज.नाईकपवार | Published: April 11, 2024 05:22 PM2024-04-11T17:22:47+5:302024-04-11T17:23:52+5:30
मडगावातून एक मोबाईल केला जप्त
सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गुजरातील सूरत येथील मोबाईल चोरी प्रकरणाचे कनेक्शन गोव्यातही असल्याचे उघड झाले असून, मडगावात एका नामंकीत मोबाईल विक्री दुकानातून या चोरीचा एक मोबाईल विकला गेला होता असे तपासात आढळून आले आहे. तेथील पोलिस गोव्यात दाखल झाले असून, त्यांनी तो मोबाईल हस्तगस्त केला आहे. या एकंदर घटनेमुळे ते मोबाईल विक्री दुकानानही संशऱ्याच्या घेऱ्यात सापडले आहे.
एका वर्षापुर्वी चाेरीची वरील घटना घडली होती. १५ मोबाईल चोरीला गेले होते. गुजरातातील सूरत येथील अमरोली पोलिस ठाण्यात यासंबधी तक्रारही दाखल करण्यात आली होती. भादंसंच्या ४२० कलमाखाली तेथील पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. एकंदर १० लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरीला गेले होते.
पोलिस तपासात याचे कनेक्शन गोव्यातही आढळले. तेथील पोलिस गोव्यात दाखल झाले व ज्यांनी हा मोबाईल विकत घेतला होता, त्याच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेसबंधी माहितीही दिली. त्या ग्राहकाकडे मोबाईल खरेदी केल्याची कागदपत्रेही आहे. तुर्त पोलिसांनी पुढील तपासासाठी हा माेबाईल जप्त केला आहे.
दरम्यान त्या खरेदीदाराने आता मडगाव पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदविली आहे. यासंबधी मडगाव पोलिसांकडे संपर्क साधला असता, त्यावर अधिक माहिती देण्यास इन्कार करण्यात आला.