समन्स बजावूनही गैरहजर राहणाऱ्या साक्षीदाराला बजाविले न्यायालयाने वॉरन्ट

By सूरज.नाईकपवार | Published: November 29, 2023 04:28 PM2023-11-29T16:28:37+5:302023-11-29T16:28:57+5:30

गोव्याचे मंत्री बाबुश विरोधातील बलात्कार प्रकरण

The court issued a warrant to the witness who remained absent despite being summoned | समन्स बजावूनही गैरहजर राहणाऱ्या साक्षीदाराला बजाविले न्यायालयाने वॉरन्ट

समन्स बजावूनही गैरहजर राहणाऱ्या साक्षीदाराला बजाविले न्यायालयाने वॉरन्ट

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव:गोव्याचे  महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधात कथित अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील खटल्यात समन्स बजावूनही न्यायालयात सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिलेल्या एका साक्षिदाराविरोधात आज बुधवारी न्यायालयाने जामीन पात्र वॉरन्ट जारी केले.

खास न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटला चालू आहे. आज हा खटला सुनावणीस आला. यावेळी या खटल्यातील क्रमांक ४४ या साक्षिदाराची साक्ष न्यायालयात सुनावणीस येणार होती. त्याला समन्सही बजाविण्यात आले होते..ते त्याला मिळालेलही होते. मात्र तो न्यायालयात सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिला. आता या खटल्याची पुढील सुनावणी बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी हाेणार आहे.

खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा मंत्री मोन्सेरात यांना यापुर्वीच न्यायालयाने दिली आहे. अन्य एक संशयित रोझी फेर्राव याही काल खटल्याच्या सुनावणीस गैरहजर होत्या. सरकारी वकील व्ही. जे. कॉस्ता व दोन्हीही संशयितांचे वकील सुनावणीच्या वेळी हजर होते. २००६ सालची ही घटना आहे. उत्तेजक पेय पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मंत्री मोन्सेरात यांच्यावर आहे.

Web Title: The court issued a warrant to the witness who remained absent despite being summoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.