महिलेची हत्या करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

By सचिन सागरे | Published: April 20, 2023 08:36 PM2023-04-20T20:36:31+5:302023-04-20T20:36:57+5:30

डोंबिवलीत कोपर भागात राहणाऱ्या गीता पोकळे (४५) यांच्याकडे संतोष सतत पैशांची मागणी करत होता

The court sentenced the man who killed the woman to life imprisonment | महिलेची हत्या करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

महिलेची हत्या करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

सचिन सागरे

कल्याण : पैशाची मागणी करूनही पैसे न देणाऱ्या महिलेची गळा आवळून हत्या करणाऱ्या संतोष नांबियार (रा. कर्नाटक) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. पी. पांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

डोंबिवलीत कोपर भागात राहणाऱ्या गीता पोकळे (४५) यांच्याकडे संतोष सतत पैशांची मागणी करत होता. गीता यांनी त्याला पैसे नसल्याचे सांगितले. मार्च २०११ मध्ये गीता यांच्या घरात संतोष गेला. यावेळी, घरात झोपलेल्या गीता यांची तारेने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर घरातील सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून संजयने पोबारा केला. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक आर. एल. कुलकर्णी यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील योगेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी के. के. शेख व पी. डी. माने यांनी मदत केली.

Web Title: The court sentenced the man who killed the woman to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.