आठ ते दहा दिवसांपासून गायब असलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:26 PM2022-02-08T19:26:12+5:302022-02-08T19:26:47+5:30
Deadbody Found : हंडरगुळी येथील घटना : सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील एक तरुण मागील आठ ते दहा दिवसांपासून गायब होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हाळी हंडरगुळी परिसरातील तिरु मध्यम प्रकल्पात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत वाढवणा (बु.) पाेलीस ठाण्यात मंगळवारी सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, गणेश पांडुरंग दापके (२७ रा. हंडरगुळी) हा तरुण बेपत्ता झाला हाेता. तर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आठ ते दहा दिवसांपसून सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर १ फेब्रुवारी रोजी वाढवणा पाेलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी तपासला प्रारंभ केला. तक्रारदार वडिलांचा जबाब पाेलिसांनी नाेंदविला. तक्रारीत दिलेल्या जाबाबत म्हटले आहे, आराेपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून गणेश दापके याच्यासोबत मागील भांडण्याच्या तक्रारीवरून जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करुन, त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तिरू प्रकल्पात टाकला.
याबाबत पांडुरंग बाजीराव दापके (६५ रा. हंडरगुळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजय शिवाजी हंगरगे, बालाजी शिवाजी हंगरगे, सुभाष गोविंद हंगरगे, संतोष गोविंद हंगरगे, त्र्यंबक दिगंबर घोगरे (सर्व रा. हंडरगुळी ता. उदगीर) आणि विजय हंगरगे याचा साडू बाळू (रा. घोणसी ता.जळकोट) यांच्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Video : नशीब बलवत्तर! लाॅन्चमधून समुद्रात प्रवासी पडला, पोहता येत असल्याने वाचला जीव
रविवारी हाेता तरुणाचा विवाह...
मयत गणेश दापके या तरुणाचा रविवार, ६ फेब्रुवारी राेजी नियाेजित विवाह साेहळा हाेता. मात्र, त्यापूर्वीच ताे अचानक गायब झाल्याने त्याचे कुटुंबीय हादरुन गेले हाेते. दरम्यान, त्याचा सर्वत्र शाेध घेण्यात आला असता, ताे आढळून आला नाही. अखेर साेमवारी सायंकाळच्या सुमारास तिरु मध्यम प्रकल्पात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा खून असावा, असा संशय त्याच्या कुटुंबियाने घेतला आहे. त्यानुसार पाेलीस तपास करत असून, एकाला ताब्यात घेतले आहे. - नाैशाद पठाण, सहायक पाेलीस निरीक्षक