१०० हून अधिक फोन, आईनं पाठलाग केला तरीही ते थांबले नाहीत; २ मित्रांचा रहस्यमय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:31 IST2025-04-13T16:30:36+5:302025-04-13T16:31:04+5:30

या दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा आहे.

The deaths of Nagesh Landage and Prajwal Navale in Chandrapur district pose a big challenge to the police | १०० हून अधिक फोन, आईनं पाठलाग केला तरीही ते थांबले नाहीत; २ मित्रांचा रहस्यमय मृत्यू

१०० हून अधिक फोन, आईनं पाठलाग केला तरीही ते थांबले नाहीत; २ मित्रांचा रहस्यमय मृत्यू

चंद्रपूर - गडचांदूर शहरात गुरुवारी सकाळी प्रज्वल नवले याचा मृतदेह सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागे आढळून आला व त्याचा मित्र नागेश लांडगे हा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला शहरामध्ये प्राथमिक उपचार करून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्याला विषबाधा झाली या निष्पन्नतेच्या आधारे डॉक्टरांनी उपचार केले. परंतु ३ दिवसांनी त्यांची मृत्यूसोबतची झुंज शेवटी अपयशी ठरून ती हरली. त्याचा १२ एप्रिलला मृत्यू झाला. त्यामुळे या दोघांच्या रहस्यमय मृत्यूने गूढ अजूनही कायम आहे. 

गडचांदूर शहरात गुरुवारी प्रज्वलच्या मृत्यूने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होते. त्यातच आता नागेशच्या मृत्यूने हे प्रकरण जटील बनलं आहे. हे दोघे कसं काय विष किंवा विषयुक्त पेय घेऊ शकतात यावर कुटुंबीयांना शंका आहे. कारण घरी जेव्हा नागेश त्या मुलीचा संदेश घेऊन आला त्यानंतरच त्याच्यासोबत अशी घटना झाली यावर प्रज्वलचे कुटुंबीय ठाम आहे. या दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा आहे.

नेमका काय आहे प्रकार?

प्रज्वल हा माणिकगड रोडवरील भारत गॅरेजमध्ये काम करत होता. त्याचे आई वडील विभक्त राहत असून प्रज्वल आईकडे राहायचा. बुधवारी दुपारी ३.३० वाजता नागेश लांडगे सायकलवरून मृतक प्रज्वलला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला. त्यावेळी नागेशच्या वागण्यावरून तो एका मुलीचा संदेश घेऊन आल्याचे आईला लक्षात आले. त्यामुळे नागेशचा मोबाईत ताब्यात घेतला. प्रज्वलच्या आईने मोबाईल घेतल्याने आपले बिंग फुटणार अशी भावना नागेशच्या मनात आली. प्रज्वलने आईला नागेशचा मोबाईल परत करण्यात सांगितले मात्र तुझा मोबाईल दे असं आई म्हणाली. नागेशचा मोबाईल परत करण्याच्या बदल्या प्रज्वलने स्वत:चा मोबाईल आईला दिला. त्यानंतर दोघे ४.३० वाजता सायकलने घराबाहेर पडले.

आईने शंभरावर केले फोन

प्रज्वलच्या आईने नागेश आणि प्रज्वलचा पाठलाग केला मात्र ते थांबले नाहीत. रात्री १० वाजेपर्यंत आईने शोध घेतला. जवळपास १०० हून अधिक वेळा तिने नागेशच्या मोबाईलवर फोन केले मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता प्रज्वल मृतावस्थेत आढळल्याची बातमी समजताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले. त्यावेळी नागेश बेशुद्ध अवस्थेत आढळला. आता उपचारावेळी नागेशच्या मृत्यूमुळे या दोघांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून यातील गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
 

Web Title: The deaths of Nagesh Landage and Prajwal Navale in Chandrapur district pose a big challenge to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.